TRENDING:

West Indies : 'मला घरी जायचंय...', हेटमायर रडकुंडीला आला; 7 दिवसांपासून भारतात अडकलेल्या वेस्ट इंडिज खेळाडूंनी उचललं मोठं पाऊल!

Last Updated:

West Indies Players Stuck in india : गेल्या 5 दिवसांपासून वेस्टइंडीजचे खेळाडू भारतात अडकून पडले आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेले युद्ध....

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
West Indies Players expresses frustration : आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय संघाने सुपर 8 मध्ये वेस्ट इंडिज संघाचा पराभव केला होता. 1 मार्च रोजी झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवल्यानंतर वेस्ट इंडिज संघाला गाशा गुंडाळावा लागला होता. या पराभवानंतर विंडीजचा संघ मायदेशी परतण्यासाठी सज्ज होता, मात्र काही अनपेक्षित घडामोडी घडल्या अन् वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना भारतातच थांबावं लागलं आहे. वेस्ट इंडिजचे खेळाडू भारतातच अडलेले असून त्यांना घरी जाण्याची घाई झाली आहे.
West Indies Players Stuck in india
West Indies Players Stuck in india
advertisement

इराण आणि इस्रायल युद्धाचा परिणाम

गेल्या 5 दिवसांपासून वेस्टइंडीजचे खेळाडू भारतात अडकून पडले आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेले युद्ध.... या युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक देशांनी आपले एअरस्पेस पूर्णपणे बंद केल्याने आंतरराष्ट्रीय विमानांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. विमान वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे विंडीजच्या खेळाडूंना विमानाचे तिकीट मिळवणं कठीण झालं आहे. मिडिल-ईस्टमध्ये निर्माण झालेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर मोठी मर्यादा आली असून खेळाडूंना भारतात थांबावं लागतंय.

advertisement

ख्रिस्तियानो रोनाल्डोची मदत घेणार? 

वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी सोशल मीडियावर इमोशनल पोस्ट केल्या असून आता त्यांना घरी जाण्याची घाई लागली आहे. तर दुसरीकडे शिमरन हेटमायर तर रडकुंडीला आल्याचं पहायला मिळतंय. तर इतर खेळाडूंनी थेट आयसीसीकडे मागणी केली. अडकलेल्या खेळाडूंनी आता मदतीसाठी चक्क फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोचे नाव घेतले आहे. वेस्टइंडीजचा खेळाडू अकील हुसैन याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक हताश करणारी पोस्ट शेअर केली. त्याने म्हटले आहे की, अशा कठीण परिस्थितीतून मला आता फक्त रोनाल्डोच वाचवू शकतो. त्यामुळे वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी मोठं पाऊल उचलत रोनाल्डोची मदत घेणार का? असा सवाल विचारला जातोय.

advertisement

विशेष चार्टर फ्लाईटची व्यवस्था

advertisement

अशातच आता आयसीसीच्या अधिकाऱ्यांसोबत एक उच्च स्तरीय बैठक पार पडल्याची माहिती मिळतीये. आयसीसीच्या बैठकीत खेळाडूंच्या सुरक्षेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. वेस्टइंडीज क्रिकेट बोर्डाने चाहत्यांना आश्वस्त केलं आहे की, खेळाडूंना परत नेण्यासाठी एका विशेष चार्टर फ्लाईटची व्यवस्था केली जात आहे. पुढील 24 तासांत ही टीम भारतातून रवाना होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. बीसीसीआयने वेस्ट इंडिजच्या खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी विशेष तयारी केली आहे.

advertisement

नियमांचं पालन करूनच पाठवलं जाणार

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्रांक्षाला 14000 रुपये दर, कांदा आणि केळीला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

दरम्यान, सध्या विंडीजचे सर्व खेळाडू भारतात सुरक्षित असून त्यांच्या वास्तव्याची योग्य सोय करण्यात आलीये. बीसीसीआय़ त्यांची योग्य काळजी घेत असल्याने आता त्यांना नियमांचं पालन करूनच वेस्ट इंडिजला पाठवलं जाईल.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
West Indies : 'मला घरी जायचंय...', हेटमायर रडकुंडीला आला; 7 दिवसांपासून भारतात अडकलेल्या वेस्ट इंडिज खेळाडूंनी उचललं मोठं पाऊल!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल