TRENDING:

Chhatrapati Sambhajinagar–Pune : पुण्याहून अवघ्या 3 तासात गाठा छ.संभाजीनगर, प्रवासाचा वेळ अर्ध्याने घटणार, 'ग्रीनफील्ड' प्रकल्पाबाबत मोठी अपडेट

Last Updated:

सध्या छत्रपती संभाजीनगर ते पुणे प्रवास करण्यासाठी साधारणपणे ६ तासांचा वेळ लागतो. मात्र, हा एक्स्प्रेस वे पूर्ण झाल्यानंतर हेच अंतर प्रवाशांना अवघ्या ३ तासांत पार करणे शक्य होणार आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुणे आणि छत्रपती संभाजीनगर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या पुणे-संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्स्प्रेस वे प्रकल्पाला अखेर अर्थसंकल्पीय निधीची जोड मिळाली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार आहे. या प्रकल्पासाठी तब्बल १४,८८६ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा करण्यात आल्याने प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुखकर होणार आहे.
'ग्रीनफील्ड' प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर (प्रतिकात्मक फोटो)
'ग्रीनफील्ड' प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

काय आहे हा प्रकल्प?

हा २४५.९ किमी लांबीचा सहापदरी ग्रीनफील्ड प्रकल्प दोन टप्प्यांत पूर्ण केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात पुणे ते शिरूर (५३.४ किमी) या मार्गाची निविदा प्रक्रिया आधीच पूर्ण झाली असून, पुढील महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील शिरूर ते संभाजीनगर (१९२.५ किमी) या मार्गासाठी निधी उपलब्ध झाल्यामुळे संपूर्ण प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे.

advertisement

प्रवासाची वेळ निम्म्यावर

सध्या छत्रपती संभाजीनगर ते पुणे प्रवास करण्यासाठी साधारणपणे ६ तासांचा वेळ लागतो. मात्र, हा एक्स्प्रेस वे पूर्ण झाल्यानंतर हेच अंतर प्रवाशांना अवघ्या ३ तासांत पार करणे शक्य होणार आहे. यामुळे व्यापारी, विद्यार्थी आणि चाकरमान्यांचा मोठा वेळ वाचणार आहे.

पुढील ५ वर्षांत बदलणार चित्र

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्रांक्षाला 14000 रुपये दर, कांदा आणि केळीला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

एमएसआयडीसीच्या नियोजनानुसार, या प्रकल्पासाठी १ वर्ष भूसंपादन आणि प्रशासकीय प्रक्रियेसाठी लागणार आहे, तर त्यानंतर रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी ४ वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. थोडक्यात, पुढील ५ वर्षांत हा आधुनिक महामार्ग वाहतुकीसाठी खुला होईल. या प्रकल्पामुळे राज्यातील दळणवळण व्यवस्थेला मोठी उभारी मिळणार असून, उद्योगांनाही चालना मिळणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Chhatrapati Sambhajinagar–Pune : पुण्याहून अवघ्या 3 तासात गाठा छ.संभाजीनगर, प्रवासाचा वेळ अर्ध्याने घटणार, 'ग्रीनफील्ड' प्रकल्पाबाबत मोठी अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल