TRENDING:

होय, इथेच आहे स्वर्गाचा दरवाजा! ब्रह्मा-विष्णू-महेश 'या' सरोवर करतात अंघोळ; हे अद्भूत ठिकाण आहे तरी कुठे?

Last Updated:
उत्तराखंडातील चमोली जिल्ह्यातील सातोपंथ सरोवर हे बद्रीनाथ मंदिरापासून 19 किमी अंतरावर वसले आहे. हे सरोवर 4600० मीटर उंचीवर असून त्याची रचना त्रिकोणी आहे. धार्मिक श्रद्धेनुसार...
advertisement
1/6
होय, इथेच आहे स्वर्गाचा दरवाजा! ब्रह्मा-विष्णू-महेश 'या' सरोवर करतात अंघोळ...
हिमालयाच्या कुशीत वसलेली ही देवभूमी तुम्हाला प्रत्येक पावलावर आश्चर्यचकित करेल. चमोली जिल्ह्यात असलेले सतोपंथ सरोवर हे अशाच मनोरंजक ठिकाणांपैकी एक आहे.
advertisement
2/6
बद्रीनाथ धामला भेट देणारे भक्त आणि ट्रेकर्स आता बद्री विशालच्या दर्शनानंतर सतोपंथकडे वळत आहेत. माणा गावाला भारताचे शेवटचे गाव म्हणतात. येथून 19 किलोमीटरच्या ट्रेकनंतर सतोपंथ सरोवरावर पोहोचता येते. ४4600 मीटर उंचीवर असलेले हे सरोवर त्याच्या त्रिकोणी आकारामुळे, रहस्यमय इतिहासामुळे आणि विहंगम दृश्यामुळे ओळखले जाते. मात्र, हा ट्रेक खूप कठीण आहे.
advertisement
3/6
सतोपंथ हे केवळ एक ट्रेकिंग स्पॉट नाही; ते एक पौराणिक ठिकाण देखील आहे. गीताराम भट्ट सांगतात की, पौराणिक मान्यतेनुसार, पांडवांनी याच ठिकाणाहून स्वर्गासाठी प्रस्थान केले होते. याच मार्गावर भीमाचा मृत्यू झाला आणि युधिष्ठिराला स्वर्गात नेण्यासाठी येथे एक दिव्य रथ आला होता. सरोवराच्या पुढे स्वर्गारोहिणी ग्लेशियर आहे, जो 'स्वर्गाकडे जाणाऱ्या पायऱ्या' या श्रद्धेशी जोडलेला आहे.
advertisement
4/6
इतर सरोवरांपेक्षा सतोपंथ सरोवराची रचना वेगळी आहे. त्याचा आकार त्रिकोणी आहे. असं म्हटलं जातं की, या सरोवराच्या तीन कोपऱ्यांमध्ये ब्रम्हा, विष्णू आणि महेश येऊव अंघोळ करतात. त्यामुळे या सरोवराला सतोपंथ म्हटलं जातं. सतोपंथ या शब्दाचा अर्थ सात मार्गांचे पवित्र धार्मिक स्थान असे होते.
advertisement
5/6
या सरोवराला मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. तसेच साधू, संत आणि साहसी लोकही भेट देतात. चंद्रकुंड आणि सूर्यकुंड ओलंडला की, ग्लेशियरचा मार्ग सुरू होतो. इथेच 7 पायऱ्या आहेत, ज्या बर्फाखाली झाकल्या गेलेल्या आहे.
advertisement
6/6
हे अद्भूत सरोवर चौखंबा पर्वताच्या कुशीत वसलेलं आहे. त्यामुळे इतकी शांतता अनुभवायला मिळते की, पर्यटक ही शांती कधीच विसरू शकत नाही. पौराणिक कथा आणि सुंदर निसर्ग यांच्या सुरेख संगम इथे पहायला मिळतो. तो अनुभव आयुष्यभर लोकांच्या लक्षात राहतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Travel/
होय, इथेच आहे स्वर्गाचा दरवाजा! ब्रह्मा-विष्णू-महेश 'या' सरोवर करतात अंघोळ; हे अद्भूत ठिकाण आहे तरी कुठे?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल