TRENDING:

दहावी आणि बारावी परीक्षार्थींना मिळणार 10 मिनिटात मदत, ठाणे ट्रॅफिक पोलिसांची रायडर्स सज्ज

Last Updated:

दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचता यावे, यासाठी ठाणे शहर वाहतूक विभागाकडून विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे : दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचता यावे, यासाठी ठाणे शहर वाहतूक विभागाकडून विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परीक्षेच्या दिवशी उशीर होणे, वाहन बिघाड, वाहतूक कोंडी आदी कारणांमुळे अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीला वाहतूक पोलीस सज्ज झाले आहेत.
News18
News18
advertisement

त्यानुसार, रस्त्यांवर 54 रायडर्स तैनात केले असून ट्राफिक कंट्रोल व्हॉट्सॲप क्रमांक आणि ट्राफिक कंट्रोल हेल्पलाईनसह 18 वाहतूक युनिटमध्ये संपर्क साधण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. तरी, परीक्षेला पोहोचण्यात रस्त्यावर अडचणी उद्भवल्यास वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाईनवर संपर्क करावा, असे आवाहन वाहतूक उप आयुक्त पंकज शिरसाट यांनी केले आहे.

नेहमीच मॅगी खाऊन कंटाळा आलाय? बनवा खास भेळ, रेसिपीचा संपूर्ण Video

advertisement

महाराष्ट्र राज्य माध्यमिक (10 वी) आणि उच्च माध्यमिक (12 वी) शालांत प्रमाणपत्र परीक्षा अनुक्रमे 10 फेब्रुवारी आणि 20 फेब्रुवारी पासून सुरू होत आहेत. या परीक्षांकरिता ठाणे पोलीस आयुक्तालयातील 1 ते 5 परिमंडळात इयत्ता 12 वी ची एकूण 126 केंद्रे तर इयत्ता 10 वी ची एकूण 223 केंद्रे आहेत. या परीक्षा केंद्रांवर परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अथवा पालकांनी वाहतूक विभागाच्या ट्राफिक कंट्रोल हेल्पलाईन क्रमांक 8286300300 व 8286400400 तसेच ट्राफिक कंट्रोल व्हॉट्सॲप क्रमांक 7039003866 आणि 18 वाहतूक युनिटमध्येही हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध केले आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नेहमीच मॅगी खाऊन कंटाळा आलाय? बनवा खास भेळ, रेसिपीचा संपूर्ण Video
सर्व पहा

याशिवाय, नियंत्रण कक्षातही तीन वाहने तैनात असणार आहेत. परीक्षाकाळात रस्त्यांवरील अडचणी संबंधित माहिती मिळताच वाहतूक पोलिसांकडून तातडीने घटनास्थळी पोहोचून वाहतुकीतील अडथळे दूर करीत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सुरक्षितपणे पोहोचण्यासाठी मदत केली जाणार आहे.

मराठी बातम्या/ठाणे/
दहावी आणि बारावी परीक्षार्थींना मिळणार 10 मिनिटात मदत, ठाणे ट्रॅफिक पोलिसांची रायडर्स सज्ज
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल