कोरोना कमी की काय, आता कित्येक वर्षांनी पुन्हा आला हा खतरनाक आजार; 40 लाख घेतले होते बळी; अशी आहेत लक्षणं
- Published by:Priya Lad
Last Updated:
या आजारावर उपचार सापडला आहे. पण तरी तो अजूनही कोरोनानंतरचा दुसरा सर्वात प्राणघातक आजार आहे.
advertisement
1/5

2019 पासून कोरोनाने जगात दहशत निर्माण केली. काही महिने कोरोनापासून सुटका मिळाली असताना आता पुन्हा कोरोनानं डोकं वर काढलं आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंच JN.1 चे रुग्ण आढळून येत असल्याने खळबळ उडाली आहे. कोरोना कमी की काय त्याता आता कित्येक वर्षांनी पुन्हा एक खतरनाक आजार आला आहे.
advertisement
2/5

या आजाराचा कोरोनाशी काहीही संबंध नाही. तसंच हा आजार नवीन नाही. वर्षांपूर्वी या आजाराने सुमारे चार लाख लोकांचे बळी घेतले होते. या आजारामुळे 1851 ते 1910 पर्यंत सुमारे चाळीस लाख लोकांनी आपला जीव गमावला होता.
advertisement
3/5
यूकेमध्ये गेल्या काही दिवसांत अनेक रुग्ण आढळले आहेत. या वर्षापर्यंत एकट्या इंग्लंडमध्ये सुमारे पाच हजार रुग्ण आढळून आले आहेत. 2022 च्या तुलनेत यात सात टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2021 नंतरची ही सर्वाधिक संख्या आहे.
advertisement
4/5
यावेळी हा आजार नवीन लक्षणं आणि नवीन दुष्परिणामांसह परतला आहे. यामध्ये निश्चितपणे खोकल्याचा समावेश होतो. ताप, थंडी वाजून येणं, भूक न लागणं, वजन कमी होणं आणि चक्कर येणं यांचा समावेश होतो.
advertisement
5/5
हा आजार दुसरा तिसरा कोणता नाही तर टीबी म्हणजे क्षयरोग आहे. या आजाराने एकेकाळी जगात खूप विनाश घडवून आणला होता. मात्र डॉट्समुळे हा आजार आटोक्यात आला. आता जरी त्याचे उपचार असले, रुग्ण पूर्णपणे बरे होत असले तरी तो अजूनही कोरोनानंतरचा दुसरा सर्वात प्राणघातक आजार आहे. (सर्व फोटो - प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
कोरोना कमी की काय, आता कित्येक वर्षांनी पुन्हा आला हा खतरनाक आजार; 40 लाख घेतले होते बळी; अशी आहेत लक्षणं