TRENDING:

फ्रिजमध्ये पाणी कोणत्या बाटलीत ठेवावे? प्लास्टिक, काच की स्टील? आरोग्यासाठी काय योग्य?

Last Updated:
फ्रीजमध्ये पाणी थंड ठेवण्यासाठी अनेकदा प्लास्टिक बाटल्यांचा वापर केला जातो, कारण त्या स्वस्त आणि सहज उपलब्ध असतात. मात्र, आरोग्याच्या दृष्टीने...
advertisement
1/5
फ्रिजमध्ये पाणी कोणत्या बाटलीत ठेवावे? प्लास्टिक, काच की स्टील?
आजकाल फ्रिज घरांमध्ये सर्वात उपयुक्त वस्तूंमध्ये गणला जातो. याचे मुख्य कारण म्हणजे अन्नपदार्थ जास्त काळ सुरक्षित राहतात. फ्रिजसाठी सर्वात जास्त उपयुक्त ऋतू म्हणजे उन्हाळा. कारण या ऋतूमध्ये पाण्याची गरज सर्वाधिक असते. लोक थंड पाणी पिण्यासाठी बाटल्यांचा वापर करतात. पण अनेकवेळा फ्रिजमध्ये पाणी ठेवताना लोक अनेक चुका करतात. खरं तर, जेव्हा फ्रिजमध्ये पाणी ठेवण्याचा विचार येतो, तेव्हा सर्वात आधी सर्वांच्या डोक्यात येते ती प्लास्टिकची बाटली.
advertisement
2/5
पण, तुम्हाला माहीत आहे का की प्लास्टिकच्या बाटलीत पाणी ठेवणे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही. यामुळे तुमच्या आरोग्यावर अनेक नकारात्मक परिणाम होण्याचा धोका वाढतो. आता प्रश्न हा आहे की फ्रिजमध्ये पाणी ठेवण्यासाठी कोणती बाटली योग्य आहे? प्लास्टिकच्या बाटलीत पाणी ठेवल्यास काय होईल? काचेच्या बाटलीतील पाणी आरोग्यासाठी चांगले आहे की नाही? स्टीलची बाटली फ्रिजमध्ये ठेवल्यास काय होईल? चला तर मग याबद्दल जाणून घेऊया...
advertisement
3/5
प्लास्टिकची बाटली : लोक सहसा फ्रिजमध्ये पिण्याचे पाणी थंड करण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करतात. याचे मोठे कारण म्हणजे प्लास्टिकच्या बाटल्या स्वस्त असतात. या बाटल्या कुठेही सहज उपलब्ध होतात. मात्र, आरोग्याच्या दृष्टीने पाहिल्यास, सर्व प्रकारचे प्लास्टिक सुरक्षित नसतात. तापमानात बदल झाल्यास काही प्लास्टिकच्या बाटल्यांमधून बीपीए (BPA) सारखे हानिकारक रसायने बाहेर पडू शकतात, जे आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असतात.
advertisement
4/5
काचेची बाटली : काचेच्या बाटल्या जरी महाग असल्या तरी त्या आरोग्यासाठी चांगल्या मानल्या जातात. लोकांना असेही वाटते की काचेच्या बाटल्या पडल्यास फुटतात आणि लोकांना इजा होऊ शकते. मात्र, आरोग्याच्या दृष्टीने काचेच्या बाटल्या सर्वात सुरक्षित मानल्या जातात. त्या पाण्यात कोणताच बदल घडवून आणत नाहीत, मग तो चवीचा असो किंवा गुणवत्तेचा. यासोबतच काच पर्यावरणपूरक देखील आहे.
advertisement
5/5
स्टीलची बाटली : स्टेनलेस स्टीलच्या (Stainless Steel) बाटल्या अधिक टिकाऊ आणि नॉन-टॉक्सिक (non-toxic) असल्याने चांगल्या असतात. त्या पाणी जास्त वेळ थंड ठेवतात आणि त्यामध्ये गंज चढण्याचा धोकाही नसतो, पण या बाटलीत काही त्रुटी आहेत, जसे की ती पूर्णपणे अपारदर्शक असते, ज्यामुळे तिच्यात किती पाणी शिल्लक आहे हे पाहणे कठीण होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
फ्रिजमध्ये पाणी कोणत्या बाटलीत ठेवावे? प्लास्टिक, काच की स्टील? आरोग्यासाठी काय योग्य?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल