Winter special laddu: हिवाळ्यात खा ‘हे’ स्पेशल लाडू; दूर पळतील सगळे आजार, राहाल एकदम फिट
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Winter special laddu लाडू हा सर्वांच्याच आवडीचा प्रकार आहे. डायबिटीसमुळे अनेकांना लाडू खाता येत नाहीत. मात्र यंदाच्या हिवाळ्यात आम्ही तुम्हाला लाडवांचे असे प्रकार सांगणार आहोत जे सगळे खाऊ शकतात. हे लाडू खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि थंडीत तुम्ही निरोगी राहाल.
advertisement
1/7

हिवाळ्यात सुका मेवा नियमितपणे खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे हाडं मजबूत होतात.मात्र काजू सारख्या सुकामेव्यात कॅलरीज जास्त असतात. अशावेळी एकच सुकामेवा जास्त खाल्याने शरीराला अपाय होऊ शकतो. त्यामुळे सुकामेव्याचे सर्व प्रकार एकत्र करून त्याचे लाडू बनवून ते थंडीत खाणं केव्हाही चांगलं.
advertisement
2/7
थंडीत मेथी दाणे खाल्ल्याने शरीर उबदार राहते. मात्र मेथी ही चवीला कडू असल्याने त्यात गुळ घालून मेथीचे लाडू केलेत तर ते चविष्ट तर होतीलच त्याचसोबत वजन कमी करण्यासाठी मेथीच्या लाडवांचा फायदा होईल.
advertisement
3/7
तिळाचे लाडू त्यांच्या उष्ण प्रवृत्तीमुळे थंडीत शरीराला उबदार ठेवण्यास मदत करतात. तिळाचे लाडू खाल्ल्याने रक्ताभिसरण सुधारतं रोगप्रतिकारशक्ती वाढते. यासह हृदयाचे आरोग्यही सुधारते याशिवाय हाडंही मजबूत झाल्याने सांधेदुखीचा त्रास कमी होतो.
advertisement
4/7
डिंकांमध्ये कॅल्शियम, प्रथिने आणि अँटिऑक्सिडंट असतात. त्यामुळे लाडू बनवताना अनेकदा डिंक लाडवांमध्ये घातले जाते. मात्र थंडीच्या दिवसात इतर लाडवांमध्ये डिंक घालण्यापेक्षा डिंकाचे लाडूही खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
advertisement
5/7
गाजर हे डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. गाजराचा हलवा आपण नेहमी खातो. मात्र थंडीमध्ये गाजराचे आगळेवेगळे लाडू बनवून खा. गाजरात जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स आढळतात. थंडीमध्ये नियमित गाजराचा लाडू खाल्ल्यास शरीराला अनेक फायदे होतील.
advertisement
6/7
अळशीच्या बिया खाण्याचे अनेक फायदे आहेत. यात ओमेगा 3 फॅटी ॲसिड असते जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. थंडीत गळणारे केस आणि कोरड्या त्वचासाठीही अळशीच्या बियांचे लाडू फायदेशीर ठरू शकतात.
advertisement
7/7
सुक्या खोबऱ्याचे लाडू हिवाळ्यात अवश्य खायला हवेत. यात प्रोटिन्स, फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि लोह भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून मोसमी आजारांना दूर ठेवता येऊ शकतं. खोबऱ्यामुळे हाडं मजबूत होतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Winter special laddu: हिवाळ्यात खा ‘हे’ स्पेशल लाडू; दूर पळतील सगळे आजार, राहाल एकदम फिट