Friday Release : शाहिद कपूर VS रिंकू राजगुरू, या आठवड्यात OTT च नाही थिएटरमध्येही धमाका!
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Friday Release : या आठवड्याच्या शुक्रवारी शाहिद कपूर ते रिंकू राजगुरू यांचे मराठी आणि हिंदी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. इतकंच नाही तर OTT वरही तुमचं धमाकेदार मनोरंजन होणार आहे.
advertisement
1/7

या आठवड्यात अॅक्शन, थ्रिलर आणि हॉररने भरलेले अनेक चित्रपट आणि वेब सिरीज OTT तसेच सिनेमागृहांमध्ये रिलीज होत आहेत. शाहिद कपूर ओ रोमियो पासून रिंकू राजगुरूच्या पुन्हा एकदा साडे माडे तीन पर्यंत. त्यामुळे चित्रपटप्रेमींसाठी हा आठवडा खास ठरणार आहे. Netflix, ZEE5, JioHotstar आणि थिएटरमध्ये रिलीज होणाऱ्या सिनेमांविषयी जाणून घेऊया.
advertisement
2/7
Mana Shankara Vara Prasad Garu हा तेलुगू अॅक्शन-कॉमेडी सिनेमा आहे. याचं लेखन आणि दिग्दर्शन अनिल रवीपुडी यांनी केले आहे. या सिनेमात चिरंजीवी मुख्य भूमिकेत असून त्यांच्यासोबत वेंकटेश, नयनतारा आणि कॅथरीन ट्रेसा दिसणार आहेत. हा सिनेमा 11 फेब्रुवारीला ZEE5 या ओटीटीवर रिलीज झाला आहे.
advertisement
3/7
Kohrra ही एक क्राईम थ्रिलर वेब सीरिज आहे. या सीरिजमध्ये सुदीप शर्मा, गुंजित चोप्रा आणि दिग्गी सिसोदिया यांच्या प्रमुख बूमिका आहेत. या सीरिजचं दिग्दर्शन रणदीप झा यांनी केलं आहे. ही रिलीज 11 फेब्रुवारीला Netflix वर रिलीज झाला आहे.
advertisement
4/7
ओ रोमिओ हा अॅक्शन थ्रिलर सिनेमा असून याचं लेखन आणि दिग्दर्शन विशाल भारद्वाज यांनी केलं आहे. हा सिनेमा हुसेन जैदी यांच्या Mafia Queens of Mumbai या पुस्तकावर आधारित आहे. सिनेमात शाहिद कपूर, तृप्ती डिमरी, नाना पाटेकर, अविनाश तिवारी, तमन्ना भाटिया, दिशा पटानी, फरीदा जलाल आणि विक्रांत मॅसी यांच्या भूमिका आहेत. हा सिनेमा 13 फेब्रुवारीला थिएटरमध्ये रिलीज होतोय.
advertisement
5/7
The Conjuring: Last Rites हा सुपरनॅचरल हॉरर सिनेमा आहे. The Conjuring या सीरिजचा हा नववा भाग असून तो स्मर्ल हॉन्टिंग या खऱ्या घटनेवर आधारित आहे. हा सिनेमा 13 फेब्रुवारीला JioHotstar वर रिलीज होणार आहे.
advertisement
6/7
'मन आतले मनातले' हा सिनेमा अॅक्शनपॅक्ड मराठी सिनेमा आहे. या सिनेमात मानसी नाईक, उपेंद्र लिमये, ऋतुराज फडके, संदीप गायकवाड, कमलेशन सावंत, अरूण नलावडे, यतीन कार्येकर, सिया पाटील, राजेश आहेर, विनित भोंडे हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहे. हा सिनेमा 13 फेब्रुवारीला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
advertisement
7/7
'पुन्हा एकदा साडे माडे तीन' हा मराठी सिनेमा येत्या 13 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. या सिनेमात अभिनेते अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, आणि रिंकू राजगुरू यांच्या प्रमुख भूमिका असून संजय नार्वेकर यात पाहुणे कलाकार म्हणून झळकणार आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Friday Release : शाहिद कपूर VS रिंकू राजगुरू, या आठवड्यात OTT च नाही थिएटरमध्येही धमाका!