Weight loss Tips: वजन कमी करायचं आहे पण खाण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही? फॉलो करा ‘या’ टिप्स
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Weight loss Tips: तुम्ही कट्टर खवय्ये आहात तर खाण्याची हीच सवय तुमच्या वजनवाढीचं कारण ठरू शकते. सतत बाहेरचं खाल्ल्यामुळे वजनवाढीचा त्रास जाणवू शकतो. तुम्हाला वजनही कमी करायचं आहे आणि जिभेला आळासुद्धा घालायाचा नाहीये तर आम्ही सांगतो त्या पद्धतीने डाएट फॉलो करा. त्यामुळे तुमचं वजनही कमी व्हायला नक्कीच मदत होईल.
advertisement
1/7

Weight loss Tips वजन कमी करायचं आहे पण, खाण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही फॉलो करा ‘या’ टिप्स (3)
advertisement
2/7
कधीही, केव्हाही खाणं टाळा. तुम्ही खाण्याची वेळ ठरवून घ्या. सुरूवातील तुम्हाला जे काही खावं वाटतं ते रात्री उशीरा खाणं टाळा. यामुळे अपचानाचा त्रास दूर होऊन अन्न पचायला मदत होईल.
advertisement
3/7
रात्री उशीरा जेवल्याने आणि जेवल्यानंतर लगेचच झोपल्याने तुमच्या चयापचय क्रियेवर फरक पडू शकतो. त्यामुळे रात्री 8 नंतर जेवण करणं बंद करा. फारच भूक लागली तर अल्पोपहार घ्या.
advertisement
4/7
फायबरयुक्त आहार घेतल्यामुळे त्यामुळे कमी खाऊनही तुमचं पोट भरलेलं राहतं. त्यामुळे अतिरिक्त भूक लागत नाही. पर्यायाने अधिकच्या कॅलरीज शरीरात जाण्याचा धोका टाळता येतो.
advertisement
5/7
फायबर्सप्रमाणे प्रोटीनयुक्त आहार शरीरासाठी फायद्याचा ठरतो. त्यामुळे तुमच्या आहारात अंडी, मसूर, ड्रायफ्रूट्स व डाळी,दूध अशा प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा.अन्न पचण्यासाठी प्रोटीन्स फायद्याचे असतात.
advertisement
6/7
वजन कमी करण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे. मात्र तुम्हाला जीममध्ये जाऊन व्यायाम करणं शक्य नसेल तर चालणं, जीना चढणं असे साधे सोपे व्यायाम करा. जेणेकरून तुमच्या शरीरातली अतिरिक्त फॅट्स बर्न व्हायला मदत होईल.
advertisement
7/7
ताण हे वजन वाढण्याच्या मागचं एक महत्त्वाच कारण आहे. त्यामुळे तुम्हाला जर वजन कमी करायचं आहे तर तुम्ही तणावमुक्त असणं गरजेचं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Weight loss Tips: वजन कमी करायचं आहे पण खाण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही? फॉलो करा ‘या’ टिप्स