Loksabha : शिर्डीत वंचितने मविआला दिला मोठा धक्का, काँग्रेसला रामराम केलेल्या महिला नेत्याला उमेदवारी
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
रूपवते यांच्यामुळे वाढली शिर्डी लोकसभेची चुरस वाढली आहे. शिर्डीत महायुती, महाविकास आघाडी आणि वंचित अशी तिरंगी लढत रंगणार आहे.
advertisement
1/5

वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेसच्या नेत्या उत्कर्षा रूपवते यांनी वंचितमध्ये प्रवेश केला आहे.
advertisement
2/5
प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थित उत्कर्षा रूपवते यांचा वंचित प्रवेश पार पडला. यावेळी राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण, जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे हे उपस्थित होते.
advertisement
3/5
शिर्डी लोकसभा मतदारसंघात उत्कर्षा रूपवते वंचितकडून निवडणूक लढणार आहेत. यामुळे शिर्डी मतदारसंघात तिरंगी लढत होईल.
advertisement
4/5
रूपवते यांच्यामुळे वाढली शिर्डी लोकसभेची चुरस वाढली आहे. शिर्डीत महायुती, महाविकास आघाडी आणि वंचित अशी तिरंगी लढत रंगणार आहे.
advertisement
5/5
शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेनेचे सदाशिव लोखंडे तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे हे निवडणूक लढवत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/अहमदनगर/
Loksabha : शिर्डीत वंचितने मविआला दिला मोठा धक्का, काँग्रेसला रामराम केलेल्या महिला नेत्याला उमेदवारी