Weather Alert : मराठवाडा आणखी तापणार, या जिल्ह्यांत पारा चढणार, हवामान विभागाचा अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
पुढील काही दिवस उन्हाचा चांगलाच तडाखा जाणवणार आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्माघात टाळण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुपारी 12 ते 4 वाजेच्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
advertisement
1/5

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील अनेक भागांत 21 एप्रिल 2025 पासून उष्णतेचा जोर वाढणार आहे. विशेषतः मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील काही दिवस उन्हाचा चांगलाच तडाखा जाणवणार आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्माघात टाळण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुपारी 12 ते 4 वाजेच्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
advertisement
2/5
बीड जिल्ह्यात 21 एप्रिल रोजी कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. 22 एप्रिलला तापमान थोडे वाढून 42 अंशांवर जाऊ शकते. आकाश स्वच्छ राहील आणि ऊन अधिक तीव्र जाणवेल. पुढील तीन-चार दिवसांतही तापमान 41 ते 43 अंश दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी डोक्यावर टोपी वापरणे शक्यतो थंड पाणी पिणे आणि उन्हातून बचाव करणे गरजेचे आहे.
advertisement
3/5
लातूरमध्येही उष्णतेचा मोठा प्रभाव जाणवणार आहे. 21 एप्रिलला कमाल तापमान 40 अंश आणि किमान तापमान 26 अंश राहील. 22 एप्रिलपासून पुढील काही दिवस तापमान 41 अंश दरम्यान राहील. दिवसा उन्हाचा तीव्रपणा अधिक असल्याने लहान मुले, वयोवृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. घरात थंड वातावरण ठेवण्यासाठी पंखे आणि थंड पाण्याचा योग्य वापर करावा.
advertisement
4/5
धाराशिव जिल्ह्यात 21 एप्रिल रोजी 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होईल, तर रात्रीचे किमान तापमान 28 अंशाच्या आसपास राहील. 22 एप्रिल रोजी आणि पुढील काही दिवस तापमान 42 अंशांपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे शेतकरी, कामगार आणि प्रवाशांनी दिवसाच्या सर्वात गरम वेळात जास्त काळ बाहेर थांबणे टाळावे, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
advertisement
5/5
नांदेड जिल्ह्यात 21 एप्रिलला सर्वाधिक उष्णतेचा अंदाज आहे. येथे कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहणार आहे. 22 एप्रिलनंतरही तापमान 43 ते 44 अंश दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो थंड ठिकाणी राहावे, पुरेसे पाणी प्यावे आणि आवश्यक असल्याशिवाय दुपारी बाहेर पडू नये अशी सूचना देण्यात आली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/बीड/
Weather Alert : मराठवाडा आणखी तापणार, या जिल्ह्यांत पारा चढणार, हवामान विभागाचा अलर्ट