Weather Alert: ताशी 40 किमीने वारे वाहणार, संभाजीनगर ते नांदेड धो धो कोसळणार, मराठवाड्यातील 5 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
Weather Alert: मराठवाड्यात पावसाचा जोर वाढला आहे. आज पुन्हा छत्रपती संभाजीनगरसह 5 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/5

मागील काही दिवसांपासून मराठवाड्यात पावसाने अनियमित हजेरी लावली. आज 16 ऑगस्ट रोजी हवामान विभागाने पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. येत्या 48 तासांत या भागात ढगाळ वातावरणासोबत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरसह 5 जिल्ह्यांना आज यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
2/5
हवामान विभागाने 16 ऑगस्ट रोजी मराठवाड्यातील 8 पैकी 5 जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. धाराशिव, बीड आणि लातूर या जिल्ह्यांना वगळता उर्वरित नांदेड, परभणी, हिंगोली, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांसाठी ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
advertisement
3/5
.कोकण आणि विदर्भातून येणाऱ्या दमट वाऱ्यांचा प्रभाव मराठवाड्यात जाणवणार आहे. त्यामुळे वातावरणात आर्द्रता वाढून पावसासाठी अनुकूल स्थिती तयार होईल. विशेषतः दुपारनंतर आणि संध्याकाळी पावसाच्या सरींचा जोर वाढू शकतो, असं हवामान विभागाने म्हटलंय.
advertisement
4/5
कृषी क्षेत्रासाठी ही पावसाची हजेरी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. सध्या खरीप पिकांच्या वाढीच्या टप्प्यात पावसाची गरज आहे आणि हवामानातील ही बदलती परिस्थिती शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरू शकते.
advertisement
5/5
हवामान विभागाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचा आणि विजांच्या कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी आसरा घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, हवामानाचा ताज्या अपडेट्ससाठी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Weather Alert: ताशी 40 किमीने वारे वाहणार, संभाजीनगर ते नांदेड धो धो कोसळणार, मराठवाड्यातील 5 जिल्ह्यांना अलर्ट