TRENDING:

आवाजाच्या दुनियेचा दुर्मिळ खजिना, PHOTOS पाहून तुम्हीही कराल कौतुक

Last Updated:
आपल्या पुढच्या पिढीला रेडिओ, ग्रामोफोन नेमकं काय असतं हे दाखवण्यासाठी एक अवलिया प्रयत्न करतोय.
advertisement
1/6
आवाजाच्या दुनियेचा दुर्मिळ खजिना, PHOTOS पाहून तुम्हीही कराल कौतुक
संगीत किंवा गाणं हा सर्वांच्याच आवडीचा भाग असतो. त्यामुळे सर्वजण गाणं ऐकतात आणि गुणगुणत सुद्धा. गाणं ऐकण्याचं पूर्वीपासूनचं मुख्य साधन म्हणजे रेडिओ. मात्र काळानुसार आता हे रेडिओ ग्रामोफोन कुठेतरी कालबाह्य होत चाललेले आहेत.
advertisement
2/6
पण हेच आपल्या पुढच्या पिढीला रेडिओ, ग्रामोफोन नेमकं काय असतं हे दाखवण्यासाठी एक अवलिया प्रयत्न करतोय.<a href="https://news18marathi.com/maharashtra/chhatrapati-sambhaji-nagar/"> छत्रपती संभाजीनगर</a> शहरातील संजय पवार यांनी या सर्व गोष्टींचा संग्रह तयार केलेला आहे.
advertisement
3/6
मूळचे लातूर जिल्ह्यातील असलेले संजय पवार हे सध्या संभाजीनगर शहरातील एका महाविद्यालयात कार्यरत आहेत. त्यांना लहानपणापासूनच या सर्व गोष्टींचं आकर्षण आणि कुतहल होतं.
advertisement
4/6
त्यामुळे आता त्यांच्याकडे दीडशे वर्षापासूनचे सर्व रेडिओ, ग्रामोफोन यांचा दुर्मिळ संग्रह आहे. पवार यांच्याकडे 10 ग्रामोफोन, 2 रेडिओ ग्राम आणि 125 रेकॉर्ड प्लेअर आहेत. तर 2000 तबकड्या त्यांनी संकलित केलेल्या आहेत. त्याचबरोबर सुटकेस सारखे दिसणारे आठ व्हिडिओ प्लेयर त्यांच्याकडे आहेत.
advertisement
5/6
पवार यांच्याकडे लॅपटॉप सारखे दिसणारे चार रेकॉर्ड प्लेयर आहेत. तसेच काही पॉकेट रेडिओ देखील त्यांनी संकलित केलेलं आहे. त्यांनी हे सर्व साहित्य मुंबईच्या चोर बाजारातून तसेच संभाजीनगर येथील रविवारच्या बाजारामधून गोळा केलंय. त्याचबरोबर ते देशभरातून संग्राहक आहेत. विंटेज वस्तूंचं कलेक्शन करणारे त्यांच्याकडून ते साहित्य मागत असतात.
advertisement
6/6
आता या दुर्मिळ वस्तूंचे पार्ट कुठेही उपलब्ध नाहीत. त्यांना दुरुस्ती करणारे मेकॅनिक देखील आता नाहीयेत. म्हणून संजय पवार स्वतः हे सगळं शिकत आहेत. सर्व वस्तू ते स्वतः दुरुस्त करतात. त्यांना त्यांच्या संग्रहाचं छान संग्रहालय तयार करायचा आहे. पुढच्या पिढीला या सर्व गोष्टी माहिती व्हाव्यात म्हणून ते सर्वांसाठी खुले करणार आहेत. हेच त्यांचं ध्येय असल्याचं संभाजी पवार सांगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
आवाजाच्या दुनियेचा दुर्मिळ खजिना, PHOTOS पाहून तुम्हीही कराल कौतुक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल