तुमच्या नावावर नसेल पण महाराष्ट्रात माकडांच्या नावावर आहे जमीन आणि बंगला!
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
महाराष्ट्रातील एका गावात चक्क माकडांच्या नावावर 33 एकर जमीन आणि बंगला आहे.
advertisement
1/7

आजपर्यंत आपण कोट्याधीश माणसांच्या गोष्टी ऐकल्या असतील. परंतु, कोट्यधीश असलेल्या माकडांबद्दल कधी ऐकलंय का? आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल पण महाराष्ट्रात खरंच कोट्यधीश माकडांचं गाव आहे. धाराशिव जिल्ह्यातील या गावाला माकडांचं उपळा म्हणूनच ओळखलं जातं. विशेष म्हणजे गावातील 33 एकर जमीन आणि माकडांची माडी नावाने दोन मजली घर सुद्धा माकडांच्या नावावर आहे.
advertisement
2/7
धाराशिव जिल्ह्यात माकडांच उपळा नावाचं गाव आहे. धाराशिव शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर तर तेर पासून 15 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. या गावाला स्वतःचा असा इतिहास आहे. या गावात प्राचीन काळापासून मोठ्या प्रमाणात माकडं होती म्हणूनच गावाचं नाव माकडांचे उपळा पडल्याचं सांगितलं जातं.
advertisement
3/7
उपळा येथे गावातील समस्त माकडांच्या नावावर जमीन असून त्याचा स्वतंत्र उताराही निघतो. उपळा ग्रामपंचायतच्या जमिनीच्या नोंदणी नुसार महाराष्ट्र शासनाच्या सातबारा उताऱ्यावर चक्क 'समस्त माकड पंच' या नावाने 33 एकर जमीन आहे. तसेच माकडांची माडी नावाने दोन मजली घर सुद्धा आहे.
advertisement
4/7
ही जमीन माकडांच्या नावावर कशी आली ही जमीन माकडांच्या नावावर कोणी केली याबद्दल मात्र काहीच माहिती नसल्याचं ग्रामस्थ सांगतात.
advertisement
5/7
प्रभू राम वनवासात असताना उपळा गावात आले. त्यांच्यासोबत माकडं आली आणि ती माकडं कालांतराने इथेच राहिली, अशी अख्यायिका गावकऱ्यांकडून सांगितली जाते. उपळा गावात लोक माकडांना विशेष मान देतात माकडे दारात आल्यानंतर त्यांना अन्नदान करतात. तर काही वेळा विवाह सोहळा सुरू करण्यापूर्वी माकडांचा सन्मान देखील केला जातो.
advertisement
6/7
गावात सध्या जवळपास 100 माकडे आहेत. जमिन माकडांच्या मालकीची असल्याचा कागदपत्रात स्पष्ट उल्लेख आहे. परंतु प्राण्यांसाठी ही तरतूद कोणी केली आणि केव्हा केली हे माहीत नाही. या जागेत आम्ही माकडांसाठी उपयुक्त फळझाडांची लागवड करणार आहेत.
advertisement
7/7
पूर्वी गावात जेव्हा जेव्हा लग्न होते तेव्हा आधी माकडांना भेटवस्तू दिली जायची आणि त्यानंतरच लग्न समारंभ सुरू व्हायचा. मात्र आता प्रत्येक जणच ही प्रथा पाळत नाही, असे गावचे सरपंच सुहास घोगरे यांनी सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/धाराशिव/
तुमच्या नावावर नसेल पण महाराष्ट्रात माकडांच्या नावावर आहे जमीन आणि बंगला!