IPL आधीच RCB च्या स्वप्नांचा चुराडा... 8.60 कोटींच्या खेळाडूचा विराटला धोका!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 च्या वेळापत्रकाची घोषणा झाली आहे. आयपीएलचा पहिला सामन्यात गतविजेती आरसीबी सनरायजर्स हैदराबादला भिडणार आहे, पण या सामन्याआधीच आरसीबी अडचणीत आली आहे.
advertisement
1/7

आयपीएल 2026 ला 28 मार्चपासून सुरूवात होणार आहे, तर आयपीएलची फायनल 31 मे रोजी होणार आहे. काही राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाली नसल्यामुळे आयपीएलच्या पहिल्या टप्प्याचं वेळापत्रकच जाहीर झालं आहे.
advertisement
2/7
आयपीएलचा पहिला सामना 28 मार्चला गतविजेती आरसीबी आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात होईल, पण पहिल्या सामन्याआधीच आरसीबीला जबर धक्का बसला आहे. आरसीबीला ट्रॉफी जिंकवण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या खेळाडूने विराट कोहलीला धोका दिला आहे.
advertisement
3/7
आरसीबीचा स्टार फास्ट बॉलर जॉश हेजलवूड त्याच्या दुखापतीतून बरा होत आहे, त्यामुळे फिजियोने हेजलवूडला मैदानात उतरण्यासाठी ग्रीन सिग्नल दिलेला नाही, त्यामुळे 28 मार्चच्या पहिल्या सामन्यात हेजलवूड खेळणार नाही, हे जवळपास निश्चित आहे.
advertisement
4/7
नोव्हेंबर महिन्यात शेफील्ड शिल्डची मॅच खेळल्यानंतर हेजलवूड एकही सामना खेळलेला नाही. या सामन्यानंतर ऍशेस आणि टी-20 वर्ल्ड कपमधूनही हेजलवूड बाहेर झाला होता.
advertisement
5/7
मागच्या काही महिन्यांपासून हेजलवूडला हॅमस्ट्रिंग, पोटरी आणि तळपायाची दुखापतीने ग्रासलं आहे. हेजलवूडवर सध्या उपचार सुरू आहेत, त्यामुळे त्याच्या आयपीएल खेळण्यावरही संकट ओढावलं आहे.
advertisement
6/7
आरसीबीची बॉलिंग ही जॉश हेजलवूडवर अवलंबून आहे. हेजलवूडने आयपीएल 2025 मध्ये धमाकेदार कामगिरी करून आरसीबीला पहिलीच ट्रॉफी जिंकवून दिली होती. हेजलवूडच्या गैरहजेरीत आरसीबीकडे नुवान तुषारा आणि जेकब डफी हे फास्ट बॉलर पर्याय आहेत.
advertisement
7/7
हेजलवूडला आयपीएलच्या बहुतेक मॅच दुखापतीमुळे मुकाव्या लागल्या, तर मात्र आरसीबीसमोर मोठी अडचण निर्माण होईल, कारण हेजलवूड वगळता आरसीबीकडे तितका अनुभवी विदेशी फास्ट बॉलर नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL आधीच RCB च्या स्वप्नांचा चुराडा... 8.60 कोटींच्या खेळाडूचा विराटला धोका!