Jalgaon News : पोहण्यासाठी धरणात उडी मारली तसाच चिखलात अडकला; जळगावातील घटनेने हळहळ
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Jalgaon News : जळगावातील चभारदरी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (नितीन नांदूरकर, प्रतिनिधी)
advertisement
1/5

जळगाव तालुक्यातील शिरसोली शिवारात असलेल्या चभारदरी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली आहे.
advertisement
2/5
सोनू उर्फ सोपान संजय महाजन (वय-19, रा. शिरसोली ता.जळगाव असे मयत तरुणाचे नाव आहे.
advertisement
3/5
सोनू शुक्रवारी त्याच्या दोन मित्रासह चभारदरी धरणावर गेला होता. सोपान महाजन पोहण्यासाठी पाण्यात उतरला असता धरणात चिखल असल्यामुळे उडी मारल्यानंतर तो फसला व पाण्यात गुदमरून त्याचा मृत्यू झाला.
advertisement
4/5
घटनेची माहिती मिळाल्यावर ग्रामस्थांनी व मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली सोनू महाजन याचा मृतदेह धरणाबाहेर काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे दाखल केला.
advertisement
5/5
रुग्णालयात कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/जळगाव/
Jalgaon News : पोहण्यासाठी धरणात उडी मारली तसाच चिखलात अडकला; जळगावातील घटनेने हळहळ