TRENDING:

4 फुटांच्या बेडवर लावली ज्वारी; टपोरे दाणे आणि भरगच्च कणीस करणार मालामाल

Last Updated:
निसर्गाचा असमतोल, बाजारभावाची गणितं आणि पिकाला मिळणारा अत्यल्प दर यातूनच मार्ग काढत अनेक शेतकरी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत आहेत.
advertisement
1/6
4 फुटांच्या बेडवर लावली ज्वारी; टपोरे दाणे आणि भरगच्च कणीस करणार मालामाल
आपल्या देशातील बहुतांश जनता शेती व्यवसायावर अवलंबून आहे. या व्यवसायासमोर अनेक आव्हाने आहेत. निसर्गाचा असमतोल, बाजारभावाची गणितं आणि पिकाला मिळणारा अत्यल्प दर यातूनच मार्ग काढत अनेक शेतकरी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत आहेत.
advertisement
2/6
<a href="https://news18marathi.com/maharashtra/jalna/">जालना</a> जिल्ह्यातील अशोक पांढरे या शेतकऱ्याने ज्वारीची चार फुटांच्या बेडवर लागवड केली आहे. मोत्यासारखे टपोरे दाणे आणि भरगच्च कणीस असलेल्या ज्वारीच्या या पिकातून त्यांना केवळ अर्ध्या एकरात 12 ते 15 क्विंटल उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे.
advertisement
3/6
अशोक पांढरे हे जालना जिल्ह्यातील काजळा या छोट्याशा गावातील सामान्य शेतकरी आहेत. घरी शेती कमी असल्याने ते वेगवेगळे प्रयोग शेतीमध्ये करत असतात. तुर्की इथून आणलेल्या बाजरीमुळे देखील अशोक पांढरे चर्चेत आले होते. त्याचबरोबर बेडवर केलेल्या सोयाबीन लागवडीतून देखील त्यांनी भरपूर उत्पन्न मिळवले. आता त्यांनी ज्वारीच्या शेतीत अनोखा प्रयोग केला आहे.
advertisement
4/6
ज्वारीची पारंपारिक पद्धतीने पेरणी करून अनेक शेतकरी एकरी 10 ते 12 क्विंटल उत्पन्न घेतात. मात्र अशोक पांढरे यांनी बार्शी येथील शेतकऱ्याकडून बियाणे मागवून त्याची चार फुटांच्या बेडवर लागवड केली. बेडवरती ठिबकची देखील व्यवस्था करण्यात आली. लागवडी वेळी 10 26 26 या खताची एक बॅग देण्यात आली.
advertisement
5/6
तर ज्वारी वाढीच्या अवस्थेत असताना 19 19 या विद्राव्य खताची मात्रा दोन वेळा देण्यात आली. योग्य नियोजन आणि प्रयोग करण्याचे धाडस यामुळे त्यांच्या शेतातील ज्वारी चांगलीच बहरली असून यातून 20 ते 25 कट्टे म्हणजे 12 ते 15 क्विंटल ज्वारी होण्याची अपेक्षा अशोक पांढरे यांनी व्यक्त केली आहे.
advertisement
6/6
मोबाईल चाळत असताना युट्युब वर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील शेतकऱ्याला दीड एकरात साठ गोण्या ज्वारी झाल्याचं पाहिलं. लगेच तिथे दिलेल्या मोबाईल नंबर वर कॉल केला. शेतकऱ्याने बियाणे उपलब्ध असल्याचे सांगितलं. त्या शेतकऱ्यांनी दोन-तीन वर्षांमध्ये निवडक कणसे जमा करून बियाणे तयार केल्याचं सांगितलं. चार फुटांच्या बेडवर ठिबक अंथरून या ज्वारीची लागवड केली. खत आणि पाण्याचे योग्य नियोजन केल्यामुळे ज्वारीचे पीक चांगलं बहरात आलं असून भरघोस उत्पन्न मिळेल, असं पांढरे यांनी सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/जालना/
4 फुटांच्या बेडवर लावली ज्वारी; टपोरे दाणे आणि भरगच्च कणीस करणार मालामाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल