रसवंतीगृहाला नाश्ता सेंटरची जोड, नवऱ्याला भक्कम साथ, रिता यांची पाहा संघर्षकथा
- Published by:News18 Marathi
Last Updated:
जालना जिल्ह्यातील रिता पाखरे यांनी स्वतः रसवंतीगृह आणि नाश्ता सेंटर सुरू केले. यातून त्यांची आता चांगली कमाई होत असून कुटुंबाच्या उदरनिर्वाह बरोबरच मुलांचे शिक्षण देखील होत आहे.
advertisement
1/7

कितीही संकटे आली तरी त्यावर मात करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असेल तर आपण या संकटातून बाहेर पडू शकतो. 2019 मध्ये आलेल्या कोरोना महामारीमुळे अनेक जण हतबल झाले. अनेक कुटुंबांना या काळात नैराश्य, बेरोजगारी, उपासमारी यासारख्या समस्यांना सामोरे जावं लागलं. मात्र, कोरोना काळ ओसरताच अनेकांनी नवी सुरुवात करत उंच उंच भरारी घेतली.
advertisement
2/7
यामध्ये महिला देखील मागे राहिल्या नाहीत. <a href="https://news18marathi.com/maharashtra/jalna/">जालना</a> जिल्ह्यातील कुंभार पिंपळगाव येथील रिता पाखरे यांची कहाणी देखील अशीच आहे. कोरोना काळातील संकटानंतर कामाची लाज न बाळगता रिता पाखरे यांनी स्वतः रसवंतीगृह आणि नाश्ता सेंटर सुरू केले. यातून त्यांची आता चांगली कमाई होत असून कुटुंबाच्या उदरनिर्वाह बरोबरच मुलांचे शिक्षण देखील होत आहे.
advertisement
3/7
रिता पाखरे या कुंभार पिंपळगाव या गावच्या रहिवाशी आहेत. कोरोना आधी त्या गृहिणी म्हणून घरचीच कामे करायच्या. मात्र, कोरोना आल्यानंतर कमाईचे साधन पूर्णपणे बंद झाली. त्यामुळे अनेक दिवस त्यांना संघर्ष करावा लागला.
advertisement
4/7
मात्र, कोरोना ओसरायला सुरुवात होताच त्यांनी स्वतः कुटुंबाचा भार सांभाळण्यास सुरुवात केली. यासाठी काहीतरी छोट मोठा उद्योग करावा ही कल्पना त्यांच्या मनात आली. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रसवंतीगृहावर उसाचा रस घेण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड असते. त्यामुळे हा व्यवसाय केल्यास फायदेशीर ठरू शकतो हे त्यांच्या लक्षात आले.
advertisement
5/7
चार वर्षांपूर्वी त्यांनी कुंभार पिंपळगाव येथे रस्त्यावर रसवंतीगृह आणि नाश्ता सेंटर सुरू केले. विशेष म्हणजे स्वतःच त्या संपूर्ण रसवंतीगृहाचं काम पाहतात. महिला असून देखील कामाची लाज न बाळगता त्यांनी ग्राहकांना चांगली सेवा दिल्याने आज त्यांचा व्यवसाय भरभराटीला आला आहे. त्या दोन व्यवसायातून दिवसाला दोन ते अडीच हजाराचा निव्वळ नफा त्या कमावतात. यातून कुटुंबाच्या उदरनिर्वाह बरोबरच त्यांच्या मुलांची शिक्षण देखील होत आहे. महिला असून देखील पुरुषांच्या बरोबरीला काम करणाऱ्या रिता पाखरे या इतर महिलांसाठी देखील प्रेरणादायी ठरत आहेत.
advertisement
6/7
कोरोना आधी मी गृहिणी म्हणून काम करायचे. माझे पती घराचा सगळा भार सांभाळायचे. मात्र, कोरोनानंतर आमच्यावर हार्दिक संकट वाढवलं. त्यामुळे फक्त पतीच्या कमाईवर विसंबून न राहता मी देखील काहीतरी हातभार लावण्याचा ठरवलं. यासाठी रस्त्यावरच रसवंतीगृह आणि नाश्ता सेंटर सुरू केले.
advertisement
7/7
यातून दोन ते अडीच हजार रुपये दिवसाला मिळतात. आमच्या उदरनिर्वाह बरोबरच मुलांची शिक्षण देखील या व्यवसायातून होत असल्याने समाधान वाटत असल्याचं रिता पाखरे यांनी सांगितलं. त्याचबरोबर इतर महिलांनी देखील कुठल्याही कामाची लाज न बाळगता प्रत्येक क्षेत्रात पुढे यावं, असं आवाहन रिता पाखरे करतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/जालना/
रसवंतीगृहाला नाश्ता सेंटरची जोड, नवऱ्याला भक्कम साथ, रिता यांची पाहा संघर्षकथा