TRENDING:

Palash Smriti : स्मृती मानधनाच्या मित्राने बेडरूम कांड समोर आणल्यानंतर पलाश मुच्छलनं उचललं मोठं पाऊल

Last Updated:
Palash Muchhal Smriti Mandhana : स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलचं लग्न मोडल्याच्या काही महिन्यांनंतर स्मृतीच्या मित्राने लग्नसोहळ्यात काय घडलं त्याचा खुलासा केला. या आरोपांनंतर आता पलाशने मोठं पाऊल उचललं आहे.
advertisement
1/5
स्मृतीच्या मित्राने बेडरूम कांड समोर आणल्यानंतर पलाश मुच्छलनं उचललं मोठं पाऊल
भारतीय क्रिकेटर स्मृती मानधनाचं पलाश मुच्छलसोबतचं लग्न मोडल्यानंतर त्याबाबत तिच्या मित्राने नुकताच एक मोठा खुलासा केला होता. लग्नाच्या दिवशी पलाशला दुसऱ्या महिलेसोबत बेडवर रंगेहाथ पकडण्यात आल्याचं त्याने सांगितलं. विद्यान माने असे स्मृतीच्या त्या मित्राचं नाव आहे, ज्याने हा खुलासा केला आहे. यानंतर पलाशने मोठं पाऊ उचललं आहे.
advertisement
2/5
गायक-संगीतकार पलाश मुच्छल आणि भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधना यांचे लग्न गेल्या वर्षीच्या सर्वात चर्चेत असलेल्या लग्नांपैकी एक होतं. हळदी, मेहंदी आणि संगीत समारंभानंतर हे जोडपं वेगळं झालं. ही बातमी चर्चेत आली. स्मृती आणि पलाश यांच्या लग्नाच्या ब्रेकअपपासून, गायक आणि संगीतकाराच्या बेवफाईची व्यापक चर्चा आहे.
advertisement
3/5
पलाश स्मृतीला बऱ्याच काळापासून फसवत होता आणि त्यांच्या लग्नादरम्यान त्याचे दुसऱ्या महिलेशी प्रेमसंबंध होते असे दावे केले जात होते. यादरम्यान स्मृतीचा जुना मित्र आणि अभिनेता-निर्माता विद्यान माने यांनी पलाश मुच्छलबद्दल धक्कादायक खुलासे केले. लग्नाच्या सेलिब्रेशन दरम्यान संबंधित पलाशला एका दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडण्यात आलं. हा सर्व प्रकार इतका गंभीर होता की, तिथं उपस्थित असलेल्या भारतीय महिला क्रिकेटर्सनी त्या व्यक्तीला चांगलाच चोप दिला, असं त्याने सांगितलं.
advertisement
4/5
आपल्यावरील हे सगळे आरोप खोटे असल्याचं सांगत पलाश मुच्छलने विद्यान मानेविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. गायकाने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे ही बातमी शेअर केली की त्याच्या वकिलाने विद्यान मानेला 10 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवली आहे.
advertisement
5/5
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पलाशने लिहिलं, 'माझे वकील श्रेयांश मितारे यांनी सांगलीच्या विद्यान मानेला 10 कोटी रुपयांची मानहानीची कायदेशीर नोटीस पाठवली आहे, कारण त्याने माझ्यावर खोटे, अपमानास्पद आणि अत्यंत बदनामीकारक आरोप केले आहेत, ज्याचा उद्देश माझी प्रतिष्ठा आणि माझी प्रतिमा खराब करणं आहे.'
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Palash Smriti : स्मृती मानधनाच्या मित्राने बेडरूम कांड समोर आणल्यानंतर पलाश मुच्छलनं उचललं मोठं पाऊल
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल