Photos: कोकणात मध्यरात्री मोठा राडा, भाजप नेत्याच्या कारमध्ये लाखोंचं घबाड, निलेश राणे आक्रमक
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचाराची वेळ संपल्यानंतर मालवणमध्ये झालेल्या पोलीस नाकाबंदीत देवगड भाजपचे तालुका अध्यक्ष महेश नारकर यांच्या गाडीत मोठी रोख रक्कम आढळल्याने खळबळ उडाली आहे.
advertisement
1/7

नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचाराची वेळ संपल्यानंतर मालवणमध्ये झालेल्या पोलीस नाकाबंदीत देवगड भाजपचे तालुका अध्यक्ष महेश नारकर यांच्या गाडीत मोठी रोख रक्कम आढळल्याने खळबळ उडाली आहे.
advertisement
2/7
हा प्रकार समोर येताच शिवसेना (शिंदे गट) आमदार निलेश राणे यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली. यानंतर तणाव वाढला.
advertisement
3/7
नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालवण पोलिसांनी रात्री १० वाजता प्रचार संपल्यानंतर रात्री उशिरा नाकाबंदी सुरू केली होती.
advertisement
4/7
याच वेळी भाजपचे देवगड तालुका अध्यक्ष महेश नारकर यांच्या MH-07-AS-6960 क्रमांकाच्या वाहनाची तपासणी केली असता, त्यांच्या गाडीत पोलिसांना मोठी रोख रक्कम आढळली.
advertisement
5/7
रक्कम सापडलेलं वाहन पोलीस ठाण्यात आणल्यानंतर लगेचच मालवण येथील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा परब आणि अजिंक्य पाताडे यांनी नंबर प्लेट नसलेली कार घेऊन पोलीस ठाणे गाठले. त्यांनी या प्रकरणी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
advertisement
6/7
बाबा परब हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळताच शिवसेना (शिंदे गट) आमदार निलेश राणे यांनी तातडीने मालवण पोलीस ठाण्यात धाव घेतली. राणे यांनी अतिशय आक्रमक पवित्रा घेत, "जोपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मी पोलीस ठाण्यातून मागे हटणार नाही," अशी ठाम भूमिका घेतली.
advertisement
7/7
त्यांच्या या भूमिकेमुळे पोलीस ठाण्यातील वातावरण चांगलेच तणावपूर्ण झाले होते. या संपूर्ण गदारोळात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा परब आणि पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांमध्ये झालेले संभाषण असलेला एक व्हिडिओही समोर आला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Photos: कोकणात मध्यरात्री मोठा राडा, भाजप नेत्याच्या कारमध्ये लाखोंचं घबाड, निलेश राणे आक्रमक