TRENDING:

Parliament Security Breach: लोकसभेत घुसखोरी करणाऱ्या लातूरच्या तरुणाचे फोटो समोर, सैन्यभरतीचं होतं स्वप्न

Last Updated:
Parliament Security Breach: संसदेच्या लोकसभा सभागृहात आज पिवळ्या धुराच्या नळकांड्या पेटवण्यात आल्या. यामुळे एकच गोंधळ उडाला होता. या घटनेतील एक आरोपी लातुरचा असल्याचे समोर आले आहे. (नितिन बनसोडे, प्रतिनिधी)
advertisement
1/5
लोकसभेत घुसखोरी करणाऱ्या लातूरच्या तरुणाचे फोटो समोर, सैन्यभरतीचं होतं स्वप्न
2001 साली संसदेवर झालेल्या हल्ल्याला आज 22 वर्ष पूर्ण होत आहे. नेमकं याच दिवशी लोकसभेच्या सुरक्षेत मोठी त्रुटी समोर आली आहे. बुधवारी संसदेचे कामकाज सुरू असताना प्रेक्षक गॅलरीतून दोन जणांनी सभागृहात उड्या मारत पिवळ्या धुराच्या नळकांड्या फोडल्या. अचानक घडलेल्या या घटनेनंतर सभागृहात गोंधळ उडाला. त्यानंतर कामकाज अचानक दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करावे लागले. घटनेनंतर लगेचच या दोन्ही व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले. संसद भवनात घडलेल्या या घटनेचं लातूर कनेक्शन समोर आलं आहे.
advertisement
2/5
संसद भवन येथे गोंधळ घालत स्मोक कँडल पेटवणारा तरुण हा चाकूर तालुक्यातील झरी (नवकुंडाची) येथील अमोल धनराज शिंदे हा असल्याचं स्पष्ट झाले आहे. अंदाजे 25 ते 27 वर्षांचा तरुण असल्याची माहिती आहे. मराठा आरक्षणाशी या प्रकरणाचा कसलाही संबंध नसून अमोल शिंदे हा दलित समाजाचा असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
advertisement
3/5
अमोल शिंदे याच्या घरची परिस्थिती बेताची आहे, आई वडील मजूरी करतात. अमोल शिंदे हा सैन्य भरतीची तैयारी करत होता, अशी ही माहिती समोर आली आहे. यासोबतच आत्ताच्या ताजी माहितीनुसार अमोल शिंदे याच्या झरी येथील घरी चाकूर पोलीस दाखल झाले असून अमोल शिंदेच्या आई वडिलांची चौकशी सध्या करतायेत. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून शिंदेच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात जमाव जमा झाला आहे.
advertisement
4/5
मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेने संसदेबाहेर गोंधळ घातला होता. ही महिला हरियाणा राज्यातील हिसार येथील रेड स्क्वेअर मार्केटमध्ये राहणाऱ्या महिलेचं नाव नीलम (वय 42) असे आहे. नीलम हिसारच्या रेड स्क्वेअर मार्केटच्या मागे असलेल्या पीजीमध्ये राहते.
advertisement
5/5
पीजीमध्ये राहून ती हरियाणा सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करत आहे. 25 नोव्हेंबरला घरी जाण्याचं कारण सांगून नीलम पीजीमधून बाहेर पडल्याचे सांगण्यात येत आहे. नीलम ही मूळची जींद जिल्ह्यातील घासो खुर्द येथील रहिवासी आहे. पीजी विद्यार्थ्याने सांगितले की, नीलमला राजकारणात खूप रस होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/लातूर/
Parliament Security Breach: लोकसभेत घुसखोरी करणाऱ्या लातूरच्या तरुणाचे फोटो समोर, सैन्यभरतीचं होतं स्वप्न
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल