TRENDING:

जानेवारी महिन्यात अवकाळी पावसाचं संकट? ला निनामुळे हवामानात बदल, हवामान विभागाने दिला अलर्ट

Last Updated:
उत्तर भारतातील थंडीचा तडाखा महाराष्ट्रात जाणवत असून, पुढील ४ दिवसांत तापमान २ ते ३ अंशांनी वाढू शकते. विदर्भ, खान्देशात गारवा कायम, मुंबईत वातावरण ढगाळ राहील.
advertisement
1/6
जानेवारी महिन्यात अवकाळी पावसाचं संकट? ला निनामुळे हवामानात बदल, हवामान विभागाने
नवीन वर्षाची सुरुवात झाली असली तरी थंडीचा खरा तडाखा सध्या उत्तर भारताला बसतोय. दिल्ली, पंजाब आणि उत्तर प्रदेशात धुक्यामुळे हातचं अंतरही दिसेनासं झालं आहे. या कडाक्याच्या थंडीचा परिणाम महाराष्ट्रावरही होत असून, राज्याच्या हवामानात आता मोठे बदल होणार आहेत.
advertisement
2/6
पाकिस्तानकडून येणारे थंड वाऱ्यांमुळे हवामानात मोठे बदल होत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात पुढचे २४ तास हवामान स्थिर राहील. पण, त्यानंतरच्या ४ दिवसांत किमान तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होऊ शकते. म्हणजेच, जो कडाक्याचा गारवा आपण गेल्या काही दिवसांपासून अनुभवत होतो, तो थोडा कमी होण्याची शक्यता आहे.
advertisement
3/6
जरी राज्याच्या इतर भागांत तापमान वाढणार असलं, तरी विदर्भ आणि खान्देशात रात्रीची हुडहुडी कायम राहणार आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे नाशिक, जळगाव आणि नागपूर परिसरात पहाटेचा गारवा टिकून असेल.
advertisement
4/6
मुंबई आणि कोकणात मात्र फारसा बदल जाणवणार नाही, तिथे वातावरण कोरडं आणि आल्हाददायक असेल. मुंबईसह कोकणात मात्र आज ढगाळ वातावरण राहणार आहे. दक्षिण आणि मध्य महाराष्ट्र वगळता उर्वरित ठिकाणी थंडी कायम राहणार आहे.
advertisement
5/6
जानेवारी ते मार्च महिन्यात देशात सरासरी पेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी असेल. या वेळी सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहील असा प्राथमिक अंदाज आहे. प्रशांत महासागरात सध्या सौम्य ला निनाचा इफेक्ट आहे. ही स्थिती पुढील काही महिने कायम राहण्याची शक्यता आहे.
advertisement
6/6
जानेवारी सुरू होताच दिवसा मात्र उकाडा वाढला आहे. रात्री गारठा जाणवत आहे. अवकाळी पावसाचं संकट सध्या आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे. मिश्र वातावरण असलं तरी अल्हाददायक स्थिती राहील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
जानेवारी महिन्यात अवकाळी पावसाचं संकट? ला निनामुळे हवामानात बदल, हवामान विभागाने दिला अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल