Mobile Interesting Facts : Phone Update केला नाही तर काय होईल, कोणता धोका?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Mobile Phone Update : फोन अपडेट म्हणजे फक्त नवीन फीचर्स नाहीत. फोनवर अपडेट आलं की शक्य तितक्या लवकर ते करणं हेच शहाणपणाचं ठरतं. नाहीतर महागात पडू शकतं.
advertisement
1/7

आता स्मार्टफोन सगळेच वापरतात. स्मार्टफोन वापरताना एक गोष्ट तुम्ही पाहिली असेल की काही दिवसांनी त्याच्यावर सॉफ्टवेअर अपडेट किंवा सिस्टम अपडेट अशी स्क्रिन किंवा मेसेज दिसू लागतो. खाली Update Now, Upate Later, Remind me later असे पर्याय येतात. कित्येक जण सहजपणे अपडेट लेटर किंवा रिमांइड मी लेटर हा ऑप्शन निवडतात. नंतर करू, फोन स्लो होईल किंवा स्टोरेज नाही अशी कारणं देऊन अपडेट टाळलं जातं आणि किती तरी दिवस फोन अपडेट करतच नाहीत. मात्र फोन अपडेट न केल्यास मोठे धोके निर्माण होऊ शकतात.
advertisement
2/7
फोन अपडेट्समधील सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे Security Patch. हॅकर्स सतत नवीन-नवीन पद्धती शोधत असतात ज्यामुळे फोनमधील माहिती चोरणं सोपं होतं. अपडेट न केल्यास बँकिंग अ‍ॅप्स हॅक होण्याचा धोका वाढतो. ओटीपी, पासवर्ड, यूपीआय माहिती लीक होऊ शकते. फोनमध्ये मालवेअर किंवा स्पायवेअर घुसू शकतं. थोडक्यात अपडेट न केलेला फोन म्हणजे हॅकर्ससाठी उघडं दार असतं.
advertisement
3/7
WhatsApp, Instagram, Google Pay, PhonePe, Paytm यासारखी अ‍ॅप्स सतत अपडेट होत असतात. पण फोनचा OS (Android/iOS) जुना असेल तर अ‍ॅप्स क्रॅश होतात. This app is not compatible with your device असा मेसेज येतो. नवीन फीचर्स वापरता येत नाहीत. हळूहळू काही अ‍ॅप्स पूर्णपणे काम करणं बंद करतात.
advertisement
4/7
लोकांना वाटतं अपडेट केल्याने फोन स्लो होतो, पण प्रत्यक्षात अपडेट न केल्याने फोनची परफॉर्मन्स हळूहळू खराब होते. रॅम आणि प्रोसेसर योग्य पद्धतीने वापरले जात नाहीत. फोन वारंवार हँग होतो किंवा रिस्टार्ट होतोय अपडेट्समध्ये अनेकदा बग फिक्सेस असतात जे फोन स्मूथ चालण्यासाठी आवश्यक असतात.
advertisement
5/7
जुना सॉफ्टवेअर असल्यास बॅटरी पटकन ड्रेन होते, फोन जास्त गरम होतो. वायफाय, मोबाईल डेटा किंवा ब्लूटूथ नीट कनेक्ट होत नाही नवीन अपडेट्समध्ये बॅटरी ऑप्टिमायझेशन आणि नेटवर्क सुधारणा केल्या जातात, ज्या न मिळाल्याने त्रास वाढतो.
advertisement
6/7
आज फोनमध्ये आपले आधार-पॅनचे फोटो, वैयक्तिक फोटो-व्हिडिओ, ई-मेल, कॉन्टॅक्ट्स, बँकिंग आणि ऑफिस डॉक्युमेंट्स हे सगळं असतं. अपडेट न केल्यास डेटा चोरीचा धोका खूप वाढतो. काही हॅकिंग अ‍ॅप्स कॅमेरा, माइक किंवा लोकेशनवरही नजर ठेवू शकतात.
advertisement
7/7
नियमित अपडेट न मिळाल्यास फोन लवकर जुना वाटू लागतो, नवीन अ‍ॅप्स सपोर्ट करत नाही. शेवटी फोन बदलण्याशिवाय पर्याय राहत नाही. अपडेट केल्यास फोन 1-2 वर्षं जास्त टिकू शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Mobile Interesting Facts : Phone Update केला नाही तर काय होईल, कोणता धोका?