TRENDING:

Virar Dwarkadhish : विरारचा कृष्णाच्या द्वारकेशी काय संबंध, विरारचं नाव द्वारकाधीशच करण्याची मागणी का?

Last Updated:
Virar Dwarkadhish :आजवर अनेक ठिकाणांची, शहरांची, स्टेशन्सची नावं बदलण्यात आली आहेत. प्रत्येक ठिकाणाच्या नावामागे काहीतरी इतिहास, अर्थ असतो. आता विरारचं नाव बदलून द्वारकाधीश करावं अशी मागणी होते आहे. द्वारका म्हणजे कृष्णाची. मग विरारचा कृष्णाच्या द्वारकेशी संबंध काय आहे? असा प्रश्न पडतोच.
advertisement
1/7
विरारचा कृष्णाच्या द्वारकेशी काय संबंध, विरारचं द्वारकाधीशच करण्याची मागणी का?
विरारचं नाव बदलून द्वारकाधीश करण्याची मागणी होते आहे. आता द्वारका म्हटलं की भगवान कृष्णाची नगरी, जी कृष्णाने वसवली त्याने तिथं राज्य केलं. पण मग या द्वारकेशी विरारचा काय संबंध की त्याचं नाव द्वारकाधीश करावं अशी मागणी होते आहे? (प्रतीकात्मक फोटो)
advertisement
2/7
महाभारतानंतर सुमारे 36 वर्षांनी यादवी युद्धानंतर द्वारका ही नगरी समुद्रात बुडाली, असं मानलं जातं. गुजरातजवळील समुद्रात प्राचीन शहराचे अवशेष सापडले, हीच द्वारका होती असं मानलं जातं. आज हिंदू धर्मातील सात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. जे मोक्षपुरी किंवा द्वारमती म्हणूनही ओळखलं जातं. (प्रतीकात्मक फोटो)
advertisement
3/7
आज इथं द्वारकाधीश मंदिर किंवा जगत मंदिर, रुक्मिणी मंदिर आणि बेट द्वारका यांसारखी अनेक धार्मिक स्थळं आहेत. द्वारकाधीश मंदिर हे प्रमुख मंदिर आहे, जे पाच मजली असून 60 खांबांवर उभे आहे आणि दरवर्षी हजारो भाविक इथं येतात. (फोटो : सोशल मीडिया)
advertisement
4/7
गुजरातमधील द्वारकाधीश मंदिराप्रमाणेच विरारमध्येही भगवान श्रीकृष्णाला समर्पित द्वारकाधीश मंदिर उभारण्यात आलं आहे. जी गुजरातमधील मूळ मंदिराची प्रतिकृती आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये या मंदिराचं उद्घाटन झालं. (फोटो : सोशल मीडिया)
advertisement
5/7
मूळ द्वारका मंदिराप्रमाणेच हे मंदिर नैसर्गिक दगडात बांधलं आहे, ज्यात भव्य गोपुरम (प्रवेशद्वार) आणि नागरा शैलीतील वास्तुकला आहे. भगवान श्रीकृष्णाची भव्य मूर्ती कृष्णशिला नावाच्या विशेष काळ्या दगडापासून बनवली आहे, जसा अयोध्येतील राम मंदिरातील मूर्ती आहे. (फोटो : सोशल मीडिया)
advertisement
6/7
मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ 56 पायऱ्या आहेत, ज्या द्वारकाधीश मंदिराच्या परंपरेचे प्रतीक आहेत. मंदिराच्या शिखरावर 52 यार्डचा ध्वजस्तंभ आहे, जो मूळ मंदिराप्रमाणेच असतो आणि तो दिवसातून चार वेळा बदलला जातो. (फोटो : सोशल मीडिया)
advertisement
7/7
हे मंदिर विरार पूर्व शिरगाव (खार्डी) इथं असून  कमी वेळातच एक शांत आणि सुंदर धार्मिक स्थळ म्हणून उदयास आलं आहे. इथं नित्य आरती, पूजा आणि विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्यामुळे हे भक्तांसाठी एक महत्त्वाचं ठिकाण बनलं आहे आणि यानंतरच आता विरारचं नाव द्वारकाधीश करावं अशी मागणी होते आहे. (फोटो : सोशल मीडिया)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Virar Dwarkadhish : विरारचा कृष्णाच्या द्वारकेशी काय संबंध, विरारचं नाव द्वारकाधीशच करण्याची मागणी का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल