TRENDING:

पुण्याच्या 'त्या' फ्लॅटवर पोलिसांचा अचानक छापा, सागरचं ते कांड पाहून चक्रावले, लगेचच ठोकल्या बेड्या

Last Updated:

सागरमल हा या फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होता आणि तेथूनच पुण्यातील औद्योगिक पट्ट्यात ड्रग्जचे जाळे पसरवत होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुणे जिल्ह्यातील औद्योगिक पट्टा असलेल्या सणसवाडी परिसरात सीमाशुल्क विभागाने (कस्टम) ड्रग्ज तस्करीच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. या धडक कारवाईत तब्बल १ कोटी ७९ लाखांचे मेफेड्रॉन (MD) जप्त करण्यात आले आहेत. प्रकरणात एका  तस्कराला बेड्या ठोकल्या आहेत. कुरकुंभ ड्रग्ज प्रकरणानंतर पुणे ग्रामीण भागात झालेली ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
ड्रग्ज तस्करीच्या विरोधात मोठी कारवाई (प्रतिकात्मक फोटो)
ड्रग्ज तस्करीच्या विरोधात मोठी कारवाई (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

फ्लॅटमधून ड्रग्जचा काळाबाजार

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, कस्टम विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने सणसवाडी येथील एका नामांकित सोसायटीतील फ्लॅटवर अचानक छापा टाकला. या छाप्यात ८९८ ग्रॅम ९४ मिलीग्रॅम मेफेड्रॉन सापडले. या प्रकरणी राजस्थानच्या जोधपूर येथील सागरमल ऊर्फ सागर बिश्नोई (वय २६) याला अटक करण्यात आली आहे. सागरमल हा या फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होता आणि तेथूनच पुण्यातील औद्योगिक पट्ट्यात ड्रग्जचे जाळे पसरवत होता.

advertisement

कस्टम विभागाचे महेंद्र पांचाल यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून, आरोपीवर अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष सरकारी वकील ऋषीराज वाळवेकर यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाचा साठा पुण्यात आला कोठून? आणि यामागे मोठे आंतरराज्य रॅकेट आहे का? याचा तपास होणे गरजेचे आहे. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबाच्या दरात मोठी उलथापालथ, कांदा आणि द्राक्षाला काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

औद्योगिक पट्ट्यात तरुण पिढीला नशेच्या जाळ्यात ओढणाऱ्या या तस्करांच्या मुसक्या आवळल्या गेल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या/पुणे/
पुण्याच्या 'त्या' फ्लॅटवर पोलिसांचा अचानक छापा, सागरचं ते कांड पाहून चक्रावले, लगेचच ठोकल्या बेड्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल