TRENDING:

मुंबईत मेट्रोचा पीलर कोसळला, ऑटो रिक्षाचा चक्काचूर, कारचा चुराडा, थरकाप उडवणारे घटनास्थळावरचे PHOTO

Last Updated:
मेट्रोच्या खांबाचा काही भाग कोसळल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर काही जण गंभीर झाल्याची माहिती आहे.
advertisement
1/5
मुंबईत मेट्रोचा पीलर कोसळला, ऑटो रिक्षाचा चक्काचूर, थरकाप उडवणारे PHOTO
मुंबई मेट्रोचे काम सुरू असताना मुलुंडनजीकच्या एलबीएल मेट्रोच्या बांधकामाचा खांब (पीलर) कोसळला. या अपघातात एकाचा मृत्यू तर तीन ते चार जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
advertisement
2/5
शनिवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास मेट्रोच्या खांबाचा काही भाग कोसळल्याने हा अपघात झाला. या अपघातात रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षाचा चक्काचूर झाला.
advertisement
3/5
तर दुसरीकडे बाजूला उभी असलेल्या कारचेही प्रचंड नुकसान झाले. कारच्या दर्शनी भागाचे नुकसान झाल्याचे समोर आलेल्या फोटोंमधून दिसत आहे.
advertisement
4/5
जॉन्सन गार्डनच्या पुढील बसस्टॉपजवळ मेट्रोच्या खांबाचा काही भाग स्लॅब कोसळला. स्लॅबखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरू आहे. यातील काहींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
advertisement
5/5
दरम्यान जॉन्सन गार्डनजवळ सुमारे अर्ध्या तासाहून अधिक काळापासून प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक पोलीस वाहतूक कोंडी हटविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
मुंबईत मेट्रोचा पीलर कोसळला, ऑटो रिक्षाचा चक्काचूर, कारचा चुराडा, थरकाप उडवणारे घटनास्थळावरचे PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल