Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क राशींचे साप्ताहिक राशीफळ; जिंकून दाखवणार, मेहनत फळास
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Weekly Horoscope: फेब्रुवारीचा तिसरा आठवडा अनेक राशीच्या लोकांच्या जीवनावर प्रभाव टाकू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार हा आठवडा खूप खास मानला जातो, कारण या आठवड्यात शुक्र, बुध, राहू, सूर्य आणि चंद्र कुंभ राशीत असतील. यासोबतच या आठवड्यात वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार आहे. या आठवड्यात अनेकांच्या आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळू शकतात. मेष, वृषभ, मिथुन, कर्क राशींचे साप्ताहिक राशीफळ जाणून घेऊ
advertisement
1/7

मेष (Aries) -मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आयुष्यात नवीन संधींची दारे उघडणारा ठरेल. गेल्या काही दिवसांपासून खूप कष्ट करूनही तुम्हाला मनासारखं यश मिळत नसेल, तर या आठवड्यात परिस्थिती सुधारायला सुरुवात होईल. नशिबाची साथ मिळाल्याने तुमची रखडलेली कामं आता पटापट पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी ऑफिसमध्ये वातावरण चांगलं राहील आणि मोठ्या साहेबांकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल.
advertisement
2/7
मेष - आठवड्याच्या शेवटी एखाद्या मोठ्या कामाबद्दल तुमचं कौतुक किंवा सत्कार होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा काळ प्रगतीचा असून परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मेहनतीचं पूर्ण फळ मिळेल. ज्या व्यापाऱ्यांना व्यवसायात तोटा होत होता, त्यांना आता चांगला नफा मिळायला लागेल. नवीन व्यवसायाचे प्लॅन्स प्रत्यक्षात येतील. एकंदरीत कामाचा वेग वाढेल. नात्यांच्या बाबतीत हा आठवडा खूपच शुभ असून मित्र आणि नातेवाईक तुमच्या पाठीशी उभे राहतील. घरातलं वातावरण आनंदी राहील.भाग्यशाली रंग: गुलाबीभाग्यशाली अंक: 6
advertisement
3/7
वृषभ (Taurus) -वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नशिबाचा असणार आहे. तुमच्या अंगात एक वेगळीच ऊर्जा आणि उत्साह जाणवेल. ठरवलेली कामं वेळेत पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला खूप समाधान मिळेल. पण, करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित कोणताही निर्णय घेताना तो भावनेच्या आहारी जाऊन किंवा गोंधळलेल्या अवस्थेत घेऊ नका, नाहीतर फायद्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. घरच्या बाबतीत घेतलेले निर्णय यशस्वी ठरतील आणि कुटुंबातल्या व्यक्ती तुमचं कौतुक करतील. पण कोणालाही असं वचन देऊ नका जे नंतर पूर्ण करणं तुम्हाला कठीण जाईल.
advertisement
4/7
वृषभ - राजकारण किंवा समाजकारणात असलेल्या लोकांसाठी आठवड्याचा शेवट खूप चांगला असून तुमचा मानसन्मान वाढेल. घरात एखादं कार्य ठरू शकतं. शिक्षण क्षेत्रातील लोकांसाठी चांगली बातमी मिळेल. फक्त बदलत्या हवामानामुळे होणाऱ्या आजारांपासून सावध राहा, खाण्यापिण्याकडे लक्ष द्या.भाग्यशाली रंग: हिरवाभाग्यशाली अंक: 1
advertisement
5/7
मिथुन (Gemini) - मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा थोडा जपून वागण्याचा आहे. तुम्हाला यश हवं असेल तर आपल्या बोलण्यावर आणि वागण्यावर ताबा ठेवावा लागेल. हा आठवडा थोडा चढ-उताराचा असल्यामुळे आठवड्याच्या सुरुवातीपासूनच वेळ, पैसा आणि शक्ती यांचं नियोजन करणं तुमच्यासाठी योग्य ठरेल. नोकरी करणाऱ्यांना आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी ऑफिसमध्ये जास्त कष्ट घ्यावे लागतील. नको त्या अडचणी टाळायच्या असतील तर आपल्या कामात कोणाची ढवळाढवळ होऊ देऊ नका आणि स्वतःचं काम दुसऱ्यावर सोपवण्याची चूक तर करूच नका. ऑफिस असो वा घर, लोकांशी वाद घालण्यापेक्षा आपल्या कामाकडे लक्ष द्या. सकारात्मक राहिलात तरच तुम्ही समोर येणारी आव्हानं पेलू शकाल. मनात नकारात्मक विचार आणू नका आणि सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. घरच्यांच्या अपेक्षांकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर नात्यात दुरावा येऊ शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवा आणि प्रेमसंबंधात जपून पाऊल टाका.भाग्यशाली रंग: लालभाग्यशाली अंक: 5
advertisement
6/7
कर्क (Cancer) - कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूपच भाग्याचा ठरेल. करिअरमध्ये हवी तशी प्रगती आणि व्यवसायात चांगला नफा पाहायला मिळेल. तुमची सगळी नियोजित कामं वेळेवर पार पडतील. आठवड्याच्या सुरुवातीलाच तुम्ही चैनीची एखादी मोठी वस्तू खरेदी करू शकता. जमीन, गाडी किंवा घर घेण्याचे प्रयत्न सुरू असतील तर तुमची इच्छा या आठवड्यात पूर्ण होऊ शकते. वडिलोपार्जित संपत्तीचे वाद मिटतील.
advertisement
7/7
कर्क - या आठवड्यात घरात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असेल. मध्यंतरी एखादा जुना मित्र किंवा जवळची व्यक्ती भेटल्यामुळे खूप आनंद होईल. कामानिमित्त होणारे प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. जर तुम्हाला नोकरी बदलायची असेल किंवा प्रमोशन हवं असेल तर ती इच्छा पूर्ण होऊ शकते. परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना विशेष फायदा होईल. आरोग्य चांगलं राहील. अविवाहित लोकांसाठी लग्नाचे योग जुळून येतील. मुलांची चिंता मिटेल आणि जोडीदारासोबत चांगला वेळ घालवता येईल.भाग्यशाली रंग: तपकिरीभाग्यशाली अंक: 3
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क राशींचे साप्ताहिक राशीफळ; जिंकून दाखवणार, मेहनत फळास