शेवटची रिव्हिजन सुरू होती परीक्षा केंद्र गाठण्याआधीच बाप-लेकीचा करुण अंत, अख्खं गाव हळहळलं
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
नागपूरच्या मोहपा रोडवर भरधाव ट्रकच्या धडकेत तन्वी आणि तिचे वडील सुभाष केशव भिवणकर यांचा मृत्यू झाला. परीक्षेला जाताना घडलेल्या या घटनेने महाराष्ट्र हळहळला.
advertisement
1/9

उदय तिमांडे, प्रतिनिधी नागपूर: हातात पेन, मनात परीक्षेची धाकधूक आणि डोळ्यांत भविष्याची स्वप्ने घेऊन तन्वी घराबाहेर पडली होती. बाबांच्या मागे बाईकवर बसून कदाचित ती शेवटची एखादी 'रिव्हिजन' करत असेल किंवा वडील तिला "पेपर सोपा जाईल, काळजी नको करू" म्हणून धीर देत असतील. मात्र, नियतीला काही वेगळंच मंजूर होतं.
advertisement
2/9
परीक्षा केंद्र अवघ्या काही अंतरावर असतानाच काळाने घाला घातला आणि एका स्वप्नवेड्या विद्यार्थिनीचा तिच्या वडिलांसह करुण अंत झाला. नागपूरच्या मोहपा रोडवर घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे.
advertisement
3/9
परीक्षा केंद्र अवघ्या काही अंतरावर असतानाच काळाने घाला घातला आणि एका स्वप्नवेड्या विद्यार्थिनीचा तिच्या वडिलांसह करुण अंत झाला. नागपूरच्या मोहपा रोडवर घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला .
advertisement
4/9
बारावीच्या बोर्ड परीक्षेला निघालेल्या बाप लेकीचा मृत्यू झाला. मोहपा गावातील सुभाष केशव भिवणकर आपल्या लाडक्या लेकीला, तन्वीला तिच्या करिअरच्या महत्त्वाच्या वळणावर साथ देण्यासाठी स्वतः दुचाकीवरून उमरेडमधील केंद्रावर सोडायला निघाले होते. सोबत तिची मैत्रीण वंशिकाही होती. सकाळी १०:३० ची वेळ, रस्त्यावर परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची लगबग होती.
advertisement
5/9
अशातच एमआयडीसी पुलाजवळ विरुद्ध दिशेने काळ बनून आलेल्या एका भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ज्या लेकीला उज्वल भविष्याकडे घेऊन जायचे होते, त्या लेकीसह वडिलांचाही तिथेच श्वास थांबला.
advertisement
6/9
ज्या वयात तन्वीने यशाची शिखरे सर करायची होती, त्या वयात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ ओढवली. घटनास्थळी विखुरलेली पुस्तके आणि रक्ताने माखलेले हॉल तिकीट पाहून उपस्थितांच्या काळजाचे पाणी झाले. अपघाताची बातमी मोहपा गावात पोहोचताच संपूर्ण गाव सुन्न झाले. गावातील प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी होते.
advertisement
7/9
आपल्या लेकीला परीक्षेत यश मिळावे म्हणून देवाला साकडे घालणाऱ्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. एका निष्पाप मुलीचा असा अंत झाल्याचे पाहून नागरिकांचा संयम सुटला. संतप्त जमावाने ट्रक चालकाला बेदम मारहाण करत ट्रकच्या केबिनला आग लावली.
advertisement
8/9
रस्ते सुरक्षा आणि भरधाव वेगाचा हा बळी असल्याची भावना लोकांमध्ये होती. परिस्थिती इतकी तणावपूर्ण होती की, जमावाने पोलिसांच्या गाड्यांवरही दगडफेक केली. पोलिसांनी कसाबसं जमावाला शांत केलं, पण तन्वी आणि तिच्या वडिलांच्या जाण्याने झालेली पोकळी आता कोणीही भरून काढू शकणार नाही.
advertisement
9/9
तन्वीची मैत्रीण वंशिका सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. तन्वीसाठी हा केवळ परीक्षेचा पेपर नव्हता, तर तिच्या आयुष्यातील महत्त्वाचे पाऊल होते. वडीलही मोठ्या उत्साहाने लेकीच्या पाठीशी उभे होते. पण एका निष्काळजी ट्रक चालकाने केवळ दोन जीव घेतले नाहीत, तर एका संपूर्ण कुटुंबाची स्वप्ने कायमची मातीत मिळवली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
शेवटची रिव्हिजन सुरू होती परीक्षा केंद्र गाठण्याआधीच बाप-लेकीचा करुण अंत, अख्खं गाव हळहळलं