TRENDING:

Weather Alert: महाराष्ट्रात पुन्हा गारपीटचा धोका, नागपूरसह विदर्भातील 8 जिल्ह्यांना हायअलर्ट

Last Updated:
Vidarbha Weather: विदर्भात गेल्या 3 दिवसांपासून घोंघावणारं अवकाळी संकट पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. आज पुन्हा 8 जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
1/5
महाराष्ट्रात पुन्हा गारपीटचा धोका, नागपूरसह विदर्भातील 8 जिल्ह्यांना हायअलर्ट
मागील तीन दिवसांपासून विदर्भातील विविध भागांत अवकाळी पावसाचा, गारपीटीचा आणि वादळी वाऱ्यांचा जोर बघायला मिळत आहे. पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. मात्र शेतकऱ्यांचे नुकसान देखील होत आहे. आज, 7 मे रोजीही हेच वातावरण कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
2/5
विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, अमरावती, यवतमाळ, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा 'यलो अलर्ट' जारी केला आहे. यामध्ये विजांचा कडकडाट अधिक असून नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
advertisement
3/5
विदर्भात सध्या कमाल तापमान 38 ते 41 अंश सेल्सियसच्या दरम्यान असून वातावरणात काहीसा दमटपणा असल्याचं अनुभवायला येत आहे. परंतु, दुपारी किंवा सायंकाळी अचानक वादळासह ढगाळ वातावरण तयार होत असून, अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट ऐकायला मिळत आहे.
advertisement
4/5
काही भागांत मंगळवारी रात्रीच्या सुमारास जोरदार वारे आणि किरकोळ गारपीटही झाल्याची माहिती आहे. हवामानातील या बदलामुळे शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसत आहे. उन्हाळी पिकं, फळपिके तसेच भाजीपाला यावर वाऱ्याचा व पावसाचा विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा आणि शक्य असेल ती पिकांची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
advertisement
5/5
नागरिकांनी विजांच्या कडकडाटाच्या वेळी उघड्यावर जाणे टाळावे, झाडांच्या खाली थांबू नये आणि शक्यतो सुरक्षित ठिकाणीच राहावे. विद्युत उपकरणांचा वापरही काळजीपूर्वक करावा, असा इशारा देण्यात आला आहे. या आठवड्याच्या अखेरपर्यंत विदर्भात असेच अस्थिर हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
Weather Alert: महाराष्ट्रात पुन्हा गारपीटचा धोका, नागपूरसह विदर्भातील 8 जिल्ह्यांना हायअलर्ट
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल