TRENDING:

'मला तुझ्या बायकोशी लग्न करायचंय', विवाहित महिलेल्या प्रेमात पार वेडा झाला प्रसिद्ध गायक, पतीकडेच घातली लग्नाची मागणी

Last Updated:
एका विवाहित स्त्रीच्या प्रेमात पडल्यानंतर सामाजिक बंधनांची पर्वा न करता, चक्क तिच्या पतीकडे जाऊन तिचा हात मागणारा हा प्रेमी त्याच्या प्रेमकहाणीमुळे आजही चर्चेचा विषय असतो.
advertisement
1/8
विवाहित महिलेल्या प्रेमात वेडा झाला प्रसिद्ध गायक, पतीकडेच घातली लग्नाची मागणी
गझल म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो रेशमी आवाजाचा जादूगार जगजीत सिंग. गझलेला राजवाड्यांमधून आणि श्रीमंतांच्या मैफिलीतून बाहेर काढून सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम जगजीतजींनी केलं.
advertisement
2/8
पण त्यांच्या गाण्यांप्रमाणेच त्यांची प्रेमगाथा सुद्धा तितकीच हळवी आणि अनपेक्षित वळणांनी भरलेली होती. एका विवाहित स्त्रीच्या प्रेमात पडल्यानंतर सामाजिक बंधनांची पर्वा न करता, चक्क तिच्या पतीकडे जाऊन तिचा हात मागणारा हा प्रेमी त्याच्या प्रेमकहाणीमुळे आजही चर्चेचा विषय असतो.
advertisement
3/8
जगजीत सिंग आणि चित्रा यांची पहिली भेट १९६७ मध्ये एका रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये झाली. तेव्हा चित्रा या विवाहित होत्या आणि जगजीत यांचा करिअरमध्ये संघर्ष सुरू होता. गंमत म्हणजे, जगजीत यांचा आवाज ऐकल्यावर चित्रा यांनी त्यांच्यासोबत गाण्यास चक्क नकार दिला होता.
advertisement
4/8
चित्रा तेव्हा देबो प्रसाद यांच्या पत्नी होत्या आणि त्यांना एक मुलगीही होती. मात्र, त्याच काळात चित्रा या आपल्या वैयक्तिक आयुष्यात एका कठीण प्रसंगातून जात होत्या.
advertisement
5/8
"न उमर की सीमा हो, न जनम का हो बंधन..." या ओळी जगजीतजींच्या आयुष्याला अगदी तंतोतंत लागू पडतात. जगजीत चित्रांच्या प्रेमात वेडे झाले होते. त्यांनी चित्रांना लग्नासाठी विचारलं, पण एका मुलीची आई असलेल्या चित्रांनी सुरुवातीला नकार दिला. पण जगजीत हार मानणाऱ्यांपैकी नव्हते. त्यांनी जो निर्णय घेतला, तो ऐकून आजही अनेकांच्या भुवया उंचावतात.
advertisement
6/8
ते थेट चित्रा यांचे पती देबो प्रसाद यांच्याकडे गेले आणि अत्यंत साधेपणाने पण ठामपणे विचारलं, "मला तुमच्या पत्नीशी लग्न करायचं आहे!" हा धाडसीपणा पाहून देबो प्रसादही थक्क झाले. अखेर १९६९ मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. विशेष म्हणजे, दोघेही एकमेकांना प्रेमाने 'मम्मी-पापा' अशी हाक मारत असत.
advertisement
7/8
जगजीत आणि चित्रा यांच्या गझल जोडीने जगभरात नाव कमावलं. त्यांच्या आयुष्यात मुलगा विवेक आला आणि सुख पूर्ण झालं असं वाटत असतानाच १९९० मध्ये घात झाला. एका कार अपघातात २१ वर्षांच्या विवेकचा मृत्यू झाला. या धक्क्याने हे दांपत्य कोलमडून गेलं. चित्रा यांनी तर त्यानंतर गाणंच सोडून दिलं. त्या म्हणाल्या होत्या, "माझा गळा आपोआप बंद झालाय."
advertisement
8/8
सप्टेंबर २०११ मध्ये ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर जगजीत सिंग यांची तब्येत खालावली आणि १० ऑक्टोबर २०११ रोजी त्यांचं दुःखद निधन झालं. पण आजही जेव्हा कधी कुणाचं मन तुटतं किंवा कुणाला आपल्या प्रेमाची आठवण येते, तेव्हा जगजीत सिंग यांच्या गझली त्या जखमेवर फुंकर घालण्याचं काम करतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'मला तुझ्या बायकोशी लग्न करायचंय', विवाहित महिलेल्या प्रेमात पार वेडा झाला प्रसिद्ध गायक, पतीकडेच घातली लग्नाची मागणी
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल