नाशिकच्या त्र्यंबकनगरीत लोटला भक्तिसागर! सलग सुट्ट्या, १ भाविकाला दर्शनासाठी लागताय ८ तास, पाहा गर्दीचे फोटो
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Nashik : नाशिक जिल्ह्यातील पवित्र त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात सध्या भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे.
advertisement
1/5

नाशिक जिल्ह्यातील पवित्र त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात सध्या भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. 26 जानेवारीचा सुट्टीचा दिवस आणि त्याला लागून आलेला शनिवार-रविवार यामुळे राज्यासह देशाच्या विविध भागांतून आलेल्या भाविकांनी त्र्यंबकेश्वर नगरी गजबजून गेली आहे. मंदिर परिसरासह संपूर्ण शहरात भक्तीमय वातावरण असून, दर्शनासाठी भाविकांना प्रचंड प्रतीक्षा करावी लागत आहे.
advertisement
2/5
मिळालेल्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्वर मंदिरापासून थेट गावाच्या हद्दीपर्यंत सुमारे 4 ते 5 किलोमीटर अंतरापर्यंत भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पहाटेपासूनच भाविक मंदिरात दर्शनासाठी दाखल होत असून, रांगा दिवसभर कायम आहेत. एका भाविकाला श्री त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी सरासरी 8 ते 9 तासांचा वेळ लागत असल्याने अनेकजण थकून जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
advertisement
3/5
विशेष म्हणजे, देणगी दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांनाही किमान 5 तास प्रतीक्षा करावी लागत आहे. गर्दीचा अंदाज लक्षात घेता, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने तात्पुरत्या स्वरूपात व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्य भाविकांना प्राधान्य देण्यासाठी आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे देवस्थानकडून सांगण्यात आले आहे.
advertisement
4/5
त्र्यंबकेश्वर शहरात सध्या एक लाखाहून अधिक भाविक दाखल झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यामुळे शहरातील प्रमुख रस्ते, पार्किंग परिसर आणि मंदिराकडे जाणारे मार्ग मोठ्या प्रमाणात गजबजले आहेत. पोलिस प्रशासन, देवस्थान ट्रस्ट आणि स्वयंसेवकांकडून भाविकांना योग्य मार्गदर्शन करण्यात येत असून, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
advertisement
5/5
दरम्यान, देवस्थान प्रशासनाने भाविकांना संयम बाळगण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. पुढील काही दिवस गर्दी कायम राहण्याची शक्यता असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी वेळेचे नियोजन करूनच मंदिरात येण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
नाशिकच्या त्र्यंबकनगरीत लोटला भक्तिसागर! सलग सुट्ट्या, १ भाविकाला दर्शनासाठी लागताय ८ तास, पाहा गर्दीचे फोटो