Vidarbha Weather: 10 ते 4 बाहेर पडू नका! विदर्भावर मोठं संकट, 3 दिवस धोक्याचे, आजचा हवमान अंदाज
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
Vidarbha Weather: एप्रिल महिन्यात विदर्भातील तापमानात मोठी वाढ झाली आहे. पुढील 3 दिवसांसाठी विदर्भाला हिटवेव्ह अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/5

विदर्भाचे ऊन म्हटलं की, अनेकांना श्वास भरून येतो. कारण विदर्भातील काही शहरांमध्ये उन्हाळ्याच्या सुरवातीपासूनच तापमानाचा पारा चढलेला असतो. एप्रिल आणि मे महिन्यात तर विदर्भात आगीचे गोळे अंगावर येत असल्यासारखे ऊन बघायला मिळते. सद्यस्थितीमध्ये विदर्भात अशीच काही स्थिती आहे.
advertisement
2/5
जगातील सर्वात उष्ण शहरांच्या यादीत विदर्भातील काही शहरांचा समावेश आहे. चंद्रपूर हे जगातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे. आता पुढील 3 दिवस विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. आज 23 एप्रिल रोजी विदर्भातील तापमान आणि हवामानाची स्थिती कशी राहील? जाणून घेऊ.
advertisement
3/5
नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अकोला आणि अमरावती या शहरांत आज 23 एप्रिल रोजी उष्णतेच्या लाटेचा देण्यात आला आहे. नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील कमाल तापमान 45 अंश तर किमान तापमान 25 ते 28 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. पुढील 3 दिवस हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
advertisement
4/5
गोंदिया, बुलढाणा, भंडारा, गडचिरोली, वाशिम आणि यवतमाळ या शहरांतील कमाल तापमान 41 ते 44 अंश सेल्सिअस असून किमान तापमान 24 ते 26 अंश सेल्सिअस दरम्यान असण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. त्यामुळे उन्हाचा कडका चांगलाच जाणवण्याची शक्यता आहे.
advertisement
5/5
पुढील तीन दिवस विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. दुपारच्या वेळी बाहेर पडणे टाळावे. आरोग्याच्या काही समस्या असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
Vidarbha Weather: 10 ते 4 बाहेर पडू नका! विदर्भावर मोठं संकट, 3 दिवस धोक्याचे, आजचा हवमान अंदाज