Nagpur Weather: नागपूरवर दुहेरी संकट, हवामानात मोठे बदल, पुढील 24 तास धोक्याचे!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
Vidarbha Weather: मे महिन्याच्या सुरुवातीलाच हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. नागपूरमध्ये उष्णतेची तीव्रता वाढली असून वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
1/7

राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. 2 मे रोजी विदर्भातील हवामानात अस्थिरता राहण्याची शक्यता आहे. उन्हाची तीव्रता काही भागांमध्ये जाणवणार असली तरी काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
2/7
विदर्भातील बहुतांश भागांत कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे राहील. अकोला 44 अंश सेल्सिअस आणि अमरावती 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत असल्याने येथे सर्वाधिक उष्णता जाणवण्याची शक्यता आहे.
advertisement
3/7
नागपूर, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांत तापमान 41 ते 43 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. त्याचबरोबर गोंदिया येथे तापमान सुमारे 37 अंश सेल्सियसपर्यंत कमाल तापमानाची शक्यता आहे. अकोला, अमरावती आणि बुलढाणा येथे दिवसभर उष्णता अधिक जाणवेल आणि दुपार किंवा सायंकाळनंतर आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
advertisement
4/7
नागपूर, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
advertisement
5/7
वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
advertisement
6/7
अचानक वाऱ्याचा वेग वाढल्यास फळ गळ होऊ शकते. भाजीपाला, टोमॅटो, भेंडीसारख्या कोवळ्या पिकांवर वाऱ्याचा परिणाम होऊ शकतो. शेतकऱ्यांनी मशागतीचे काम हवामानाच्या अंदाजानुसार करावे. झाडांना आधार देणे, शेड नेटचा वापर करणे अशा उपायांनी नुकसान टाळता येईल, अशी माहिती कृषी तज्ज्ञांनी दिली आहे.
advertisement
7/7
2 मे रोजी विदर्भात उन्हाची तीव्रता व काही भागांत वादळी पावसाचा धोका एकत्रितपणे जाणवणार आहे. हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष देऊन आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
Nagpur Weather: नागपूरवर दुहेरी संकट, हवामानात मोठे बदल, पुढील 24 तास धोक्याचे!