TRENDING:

Nanded Tractor Accident: दोन महिलांना वाचवलं अन् घरच्या लक्ष्मीला बुडताना पाहिलं, इरबाजीचं ऐकून गावं रडलं

Last Updated:
मी शेतात काम करत होतो. ट्रॅक्टर कोसळण्याचा मोठा आवाज झाला. तसा मी पळत आलो. माझ्या बायको सुद्धा त्यामध्ये होती, ट्रॅक्टर सरळ विहिरीत गेलं.
advertisement
1/10
दोन महिलांना वाचवलं अन् घरच्या लक्ष्मीला बुडताना पाहिलं, इरबाजीचं ऐकून गावं रडलं
नांदेडमध्ये महिला मजुरांना घेऊन जाणारं ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्यामुळे 7 महिलांचा मृत्यू झाला. या घटनेनं अवघा समाज मन सुन्न झालं. जेव्हा हा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला तेव्हा काही जण मदतीला धावून आले. यामध्ये इरबाजी सरोदे सुद्धा मदत करत होता पण जेव्हा महिलांचे मृतदेह बाहेर काढले त्यामध्ये त्याच्या बायकोचाही समावेश होता. आपल्या बायकोचा मृतदेह पाहून तो ढसाढसा रडला.
advertisement
2/10
हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गुंज गावातील शेतमजूर महिला आज शुक्रवारी सकाळी नांदेड जिल्ह्यातील आलेगाव शिवारात शेतमजुरीच्या कामासाठी गेल्या होत्या. शेतमालकाने पाठवलेल्या ट्रॅक्टरमध्ये बसून या महिला दगडोजी शिंदे यांच्या शेतात जात असताना पहाटे आलेगाव शिवारातील एका विहिरीत ट्रॅक्टर जाऊन कोसळले.
advertisement
3/10
ट्रॅक्टर कोसळत असताना ट्रॅक्टर चालक मात्र उडी मारून पसार झाला. तुडुंब पाण्याने भरलेल्या या विहिरीमध्ये ट्रॉलीसह हे ट्रॅक्टर कोसळलं. त्यामध्ये 10 जण विहिरीमध्ये अडकले यामध्ये एका पुरुषाचा समावेश होता. ही घटना कळताच काही शेतकरी धावत आले आणि दोन महिला मजूर व एका पुरुषाला दोर खंडाच्या साह्याने बाहेर काढण्यात यश आलं.
advertisement
4/10
या मदत करणारामध्ये गावातीलच एक रहिवाशी इरबाजी सरोदे हा त्याच भागात शेतामध्ये कामाला होता. ट्रॅक्टर कोसळण्याचा आवाज आल्यानंतर तो मदतीला धावून आला.
advertisement
5/10
इरबाजी सरोदे याने देखील या मजुरांना बाहेर काढायला मदत केली. दोन महिला आणि एक पुरुष बाहेर निघाले होते. परंतु या बुडालेल्या महिलांमध्ये त्यांच्या देखील पत्नी ज्योती सरोदेचा समावेश होता हे त्याला माहित देखील नव्हतं.
advertisement
6/10
'मी दोन महिलांना वाचवलं. सुर्वाबाई तांबे आणि पार्वतीबाई भुरड यांना वाचवलं. सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मी शेतात काम करत होतो. ट्रॅक्टर कोसळण्याचा मोठा आवाज झाला. तसा मी पळत आलो. माझ्या बायको सुद्धा त्यामध्ये होती. ट्रॅक्टर सरळ विहिरीत गेलं. ड्रायव्हर पळून गेला. मी भूईमुंग निवडायला आलो होतो. आम्ही १० ते १२ माणसं कामाला आलो होतो' असं इरबाजी सरोदे याने सांगितलं.
advertisement
7/10
प्रशासनाला हे वृत्त कळताच नांदेड पोलीस हिंगोली, पोलीस महसूल अधिकारी क्रेन आणि इतर साहित्य घेऊन बचावासाठी आलेगाव परिसरातील शिवारात पोहोचले. वसमतचे आमदार चंद्रकांत नवघरे, नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर हे देखील घटनास्थळी सकाळी पोहोचले. या विहिरीमध्ये पाणी तुडुंब असल्याने मोटारींच्या साह्याने आधी पाणी उपसून घ्यावे लागलं, यामध्ये बराच वेळ गेला. ज्या कामांमध्ये परिसरातील गावकऱ्यांनी युवकांनी देखील केलेली सहभाग घेतला होता.
advertisement
8/10
दुपारपर्यंत विहिरीतून पाणी काढणं सुरू होतं. परंतु सात महिला मजूर मात्र विहिरीमध्ये ट्रॅक्टरच्या खाली अडकून पडल्या होत्या. बचावकार्य सुरू होतं परंतु विहिरीत बुडालेल्या महिलांच्या नातेवाईकांचा बाहेर आक्रोश सुरू होता.
advertisement
9/10
अखेर विहिरीतलं पाणी कमी झाल्यानंतर ट्रॅक्टर ट्रेनच्या साह्याने बाहेर काढलं व या सात महिला मजुरांना देखील बाहेर काढण्यात यश आलं परंतु या सातही महिला मृत पावल्याचे प्रशासनाने सांगितले.
advertisement
10/10
या दुर्घटनेने संपूर्ण नांदेड आणि हिंगोली जिल्हा हादरून गेला तर या महिलांचे रहिवासी गाव असलेल्या हिंगोलीतील वसमत तालुक्यातील गुंज गावावर मात्र शोककळा पसरली आहे. शासनाने मयतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर केली. परंतु कुणाची आई कुणाची पत्नी या मात्र परत येणार नाहीत त्यामुळे या गावावर दुःखाचे सावट आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Nanded Tractor Accident: दोन महिलांना वाचवलं अन् घरच्या लक्ष्मीला बुडताना पाहिलं, इरबाजीचं ऐकून गावं रडलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल