Nashik Rahad: एकदा अनुभवायला हवी अशी नाशिकची 'रहाड', हे 5 ठिकाण नक्कीच अनुभवा
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
येत्या रविवारी अर्थात 8 मार्च रोजी महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये रंगपंचमी सेलिब्रेट केली जाते. रंगपंचमीच्या दिवशी नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर सेलिब्रेशन केले जाते. नाशिकमध्ये रहाड खेळली जाते. कोणकोणत्या भागामध्ये ही रहाड खेळली जाते, जाणून घेऊया...
advertisement
1/8

होळीच्या पाचव्या दिवशी महाराष्ट्रातल्या काही ग्रामीण भागांमध्ये रंगपंचमी साजरी केली जाते. नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या जल्लोषामध्ये आणि आनंदात होळी साजरी केली जाते. नाशिकच्या रंगपंचमीची चर्चा फक्त नाशिकमध्येच नाही तर, मुंबईसह इतरत्र ठिकाणीही जोरदार चर्चा होते.
advertisement
2/8
यंदा रंगपंचमी रविवारी अर्थात 8 मार्च 2026 रोजी अनेक ग्रामीण भागात खेळली जाणार आहे. जर तुमचाही नाशिकमध्ये रंगपंचमी सेलिब्रेट करण्याचा विचार असेल, तर नक्की सहभागी होऊ शकता. नाशिकमध्ये काही ठिकाणी जोरदार रंगपंचमी सेलिब्रेट केली जाते. नाशिकमध्ये अशा रहाड आहेत, ज्या पेशवेकालीन आहेत. जमिन खोदून रहाडीमध्ये रंगपंचमी साजरी केली जाते, कोणकोणत्या त्या रहाड आहेत, जाणून घेऊया...
advertisement
3/8
पंचवटीतल्या नाईकवाडी पुरा येथे असलेल्या जुन्या तांबटलेन परिसरामध्ये रहाड भरवली जाते. पेशवेकालीन पाषणातील दगडांमध्ये या रहाडीचे बांधकाम केले असून या रहाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर नाशिककर हजर राहतात. रहाडीचा रंग केशरी किंवा लालसर असून पळसाची फुले, तुळस आणि चंदनाचा वापर करून रहाडीचा रंग तयार केला जातो.
advertisement
4/8
नाशिकच्या प्रसिद्ध असलेल्या बुधा हलवाईच्या दुकानासमोर तिवंधा चौकात पेशवेकालीन रहाड आहे. या रहाडीचा रंग पिवळा असून हा पूर्णपणे फुलापासून बनवला जातो. या रहाडीमध्ये अर्धा महिलांसाठी आणि अर्धा भाग पुरूषांसाठी राखीव असतो. त्यामुळे नाशिककरांना रंगपंचमीचा पूर्ण आनंद लुटता येतो.
advertisement
5/8
गाडगे महाराज पुलाजवळील दिल्ली दरवाजा चौकात रहाड असते. पळसाच्या फुलांपासून रहाडीसाठी केशरी रंग बनवला जातो. दुपारच्या वेळेमध्ये ही रहाड भरवली जाते. दुपारी 3.15 पासून रहाडीला सुरूवात होते.
advertisement
6/8
शनी चौकातील रहाड, जी नाशिकमधील सुप्रसिद्ध मंदिर काळाराम मंदिराच्या उत्तरेच्या बाजूला आहे. जी पेशवे काळातील आहे. या रहाडीमध्ये गुलाबी रंग असतो. संध्याकाळी ही रहाड खेळण्यासाठी नाशिककर एकत्र येतात. चार वाजता ही रहाड खेळण्यासाठी सुरूवात होते.
advertisement
7/8
नाशिकमधील काझीपुरा पोलीस चौक परिसरात तीनशे वर्षांपूर्वीची पेशवे कालीन दंडे हनुमान रहाड आहे. रहाडीमध्ये वेगवेगळे फुलं एकत्रित करून गडद गुलाबी रंग तयार केला जातो. दंडे हनुमान चौकातील रहाडीचा आनंद घेण्यासाठी नाशिककर मोठ्या प्रमाणावर एकत्र येतात.
advertisement
8/8
रहाडीची पेशवाईंच्या काळापासून सुरू असलेली ही परंपरा असून 10 ते 12 किंवा 10 ते 15 फूट इतके हे रहाड खोदले जाते. यामध्ये वेगवेगळे पर्यावरण पूरक रंग बनवून खेळले जाते. नाशिकमध्ये खेळली जाणारी रहाड एका पाठोपाठ आहे, त्यामुळे नाशिककर सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावत असतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik Rahad: एकदा अनुभवायला हवी अशी नाशिकची 'रहाड', हे 5 ठिकाण नक्कीच अनुभवा