तृषा क्रिष्णनमुळे मोडला विजयचा 27 वर्षांचा संसार! 'या' फेमस अभिनेत्रींवरही लागलेत घरं फोडल्याचे आरोप, काहींनी तर थेट लग्नच केलं
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Thalapathy Vijay-Trisha Krishnan Dating: ही पहिलीच वेळ नाही जेव्हा एखाद्या अभिनेत्रीवर 'घरं फोडल्याचा' किंवा विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात पडल्याचा आरोप झाला आहे. या यादीत सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज अभिनेत्रींच्या नावांचा समावेश आहे.
advertisement
1/12

दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा सुपरस्टार आणि थलापथी म्हणून ओळखला जाणारा विजय सध्या एका मोठ्या वैयक्तिक वादात अडकला आहे. विजयची पत्नी संगीता सोर्णलिंगम हिने लग्नाच्या २७ वर्षांनंतर चेन्नईतील चेंगलपट्टू कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
advertisement
2/12
या घटस्फोटामागे विजयचे एका अभिनेत्रीसोबत असलेले कथित संबंध कारणीभूत असल्याचा दावा संगीताने केला आहे. त्यातच, ५ मार्च रोजी चेन्नईत पार पडलेल्या एका हाय-प्रोफाईल लग्नाच्या रिसेप्शनला विजय आणि अभिनेत्री तृषा कृष्णन यांनी एकाच रंगाचे कपडे घालून हजेरी लावल्याने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.
advertisement
3/12
मात्र, ही पहिलीच वेळ नाही जेव्हा साऊथच्या एखाद्या अभिनेत्रीवर 'घरं फोडल्याचा' किंवा विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात पडल्याचा आरोप झाला आहे. या यादीत सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज अभिनेत्रींच्या नावांचा समावेश आहे.
advertisement
4/12
सध्या तृषा कृष्णन हे नाव सर्वात जास्त चर्चेत आहे. संगीताने आपल्या याचिकेत दावा केला आहे की, २०२१ पासून विजय एका अभिनेत्रीच्या प्रेमात असून तो तिच्यासोबतच सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहतो. कालच्या रिसेप्शनमध्ये विजय आणि तृषा एकाच गाडीतून उतरले, ज्यामुळे या चर्चांना अधिक जोर मिळाला आहे.
advertisement
5/12
साऊथची 'लेडी सुपरस्टार' नयनतारा एकेकाळी दिग्दर्शक प्रभू देवा यांच्या प्रेमात होती. त्यावेळी प्रभू देवा यांचा लता यांच्याशी लग्न झालं होतं. या अफेअरमुळे प्रभू देवांच्या संसारात वादळ आलं आणि त्यांच्या पत्नीने नयनताराच्या विरोधात उपोषण करण्याची धमकीही दिली होती. महिला संघटनांनी तर नयनताराच्या पुतळ्याचे दहन करून निषेध नोंदवला होता.
advertisement
6/12
बॉलीवूड आणि साऊथ गाजवणारी तब्बू तब्बल १० वर्ष सुपरस्टार नागार्जुनच्या प्रेमात होती, असं म्हटलं जातं. नागार्जुन विवाहित असूनही हे दोघं लिव्ह-इनमध्ये राहत असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, नागार्जुनने आपली पत्नी अमला हिला सोडण्यास नकार दिल्यामुळे तब्बूने अखेर हे नातं संपवण्याचा निर्णय घेतला.
advertisement
7/12
सामंथाचा एक्स पती नागा चैतन्य शोभिता धुलिपालाला डेट करत असल्याच्या बातम्या होत्या. नेटकऱ्यांनी शोभितावर असा आरोप केला की, तिच्यामुळेच सामंथा आणि नागा चैतन्यचा संसार मोडला. मात्र, नागा चैतन्यने स्पष्ट केलं होतं की घटस्फोटानंतरच त्याचं आणि शोभिताचं नातं सुरू झालं.
advertisement
8/12
आपल्या रिलेशनशिपला अधिकृत नात्याचं नाव देत नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांनी ४ डिसेंबर २०२४ रोजी लग्नगाठ बांधली. त्यांचे लग्न आणि लग्नाशी संबंधित सर्व विधींचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.
advertisement
9/12
दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथाचं नाव 'फॅमिली मॅन' फेम दिग्दर्शक राज निदिमोरू यांच्यासोबत जोडलं गेलं होतं. चर्चा अशी होती की राज विवाहित असूनही सामंथा त्यांच्या जवळ गेली होती.
advertisement
10/12
राज यांचा २०२३ मध्ये घटस्फोट झाला असला, तरी या नात्यामुळे सिनेसृष्टीत मोठी खळबळ उडाली होती. अखेर गेल्यावर्षी १ डिसेंबर रोजी समांथा आणि राज यांनी गुपचूप लग्न उरकून या चर्चांना खरं ठरवलं.
advertisement
11/12
सुपरस्टार कमल हासन जेव्हा वाणी गणपतीसोबत वैवाहिक जीवनात होते, तेव्हाच ते अभिनेत्री सारिकाच्या प्रेमात पडले. १९८५ मध्ये ते सारिकासोबत राहू लागले, ज्यामुळे त्या काळी मोठी टीका झाली होती. नंतर या दोघांनी लग्न केलं पण पुढे तेही वेगळे झाले.
advertisement
12/12
प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी देखील एका विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात पडल्या होत्या. सुरुवातीला त्यांचे मिथुन चक्रवर्तीशी प्रेमसंबंध होते. नंतर, श्रीदेवी विवाहित निर्माता बोनी कपूर यांच्या प्रेमात पडल्या. त्यांनी १९९६ मध्ये लग्न केले. विशेष म्हणजे, त्या लग्नाआधीच गरोदर होत्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
तृषा क्रिष्णनमुळे मोडला विजयचा 27 वर्षांचा संसार! 'या' फेमस अभिनेत्रींवरही लागलेत घरं फोडल्याचे आरोप, काहींनी तर थेट लग्नच केलं