Sharad Pawar : विधानसभेआधी दोघांनाही नवं चिन्ह द्या; शरद पवार गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह या प्रकरणाचा सुप्रीम कोर्टातील निकाल लागत नाही तोपर्यंत अजित पवार यांना नवीन चिन्ह द्या अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आलीय.
advertisement
1/5

विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह या प्रकरणी अद्याप सुनावणी पूर्ण झालेली नाही. त्यातच विधानसभा निवडणूक तोंडावर आलीय. जोपर्यंत सुनावणीचा निकाल लागत नाही तोपर्यंत अजित पवार यांनाही नवं चिन्ह द्या अशी मागणी शरद पवार गटाने केली आहे.
advertisement
2/5
सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत शरद पवार गटाने म्हटलं की, निवडणूक आयोगाने जो निकाल दिला आहे तो आमदारांच्या आधारावर दिला आहे, त्यामुळे जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह या प्रकरणाचा सुप्रीम कोर्टातील निकाल लागत नाही तोपर्यंत अजित पवार यांना नवीन चिन्ह द्या.
advertisement
3/5
विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांना नवीन चिन्ह घेण्यास सांगावे अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या पक्षाकडून शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण मेन्शन केलंय. या प्रकरणी लवकर सुमावणी घ्यावी अशी मागणी शरद पवार गटाने केलीय.
advertisement
4/5
शरद पवार गटाने दाखल केलेल्या याचिकेवर 25 सप्टेंबर रोजी या प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. याआधीही 2 वेळा शरद पवार यांच्या पक्षाकडून हे प्रकरण मेंशन करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र कोर्टाने त्यावर सुनावणी घेतली नव्हती. त्यामुळे आता कोर्ट नक्की सुनावणी कधी घेणार हे आज येणाऱ्या कोर्टाच्या लिस्टमधून स्पष्ट होणार आहे.
advertisement
5/5
लोकसभा निवडणुकीआधी निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला तुतारी चिन्ह आणि नवं नाव दिलं होतं. तेव्हा अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह वापरण्यास बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Sharad Pawar : विधानसभेआधी दोघांनाही नवं चिन्ह द्या; शरद पवार गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव