TRENDING:

LPG गॅस ते गुगल पे… येत्या 1 ऑक्टोबरपासून 5 मोठे बदल; काय महाग, काय स्वस्त?

Last Updated:
New Rule in October2025 : ऑक्टोबर महिना हा सर्व सामान्यांसाठी महत्त्वाचा आहे. कारण या महिन्यामध्ये सणवार तर आहेच, पण सोबतच अनेक सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे अनेक नियमही याच महिन्यापासून लागू होणार आहेत. या सर्व गोष्टींचा सर्वसामान्यांच्या दैनंदीन गोष्टीवर थेट परिणाम होणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या 1 तारखेपासून अनेक नियम बदलणार आहेत. यात UPI वापरण्यापासून ते रेल्वे तिकीट बुकिंग करण्यापर्यंत आणि गॅस सिलिंडरच्या दरापासून ते तुमच्या पेन्शनच्या गुंतवणुकीपर्यंतच्या बदलांचा समावेश असणार आहे. त्यामुळे या बदलांची नोंद असणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक असणार आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात कोणते मोठे बदल होणार आहेत एक नजर टाकूयात...
advertisement
1/6
LPG गॅस ते गुगल पे… येत्या 1 ऑक्टोबरपासून 5 मोठे बदल; काय महाग, काय स्वस्त?
ऑक्टोबर महिन्याच्या 1 तारखेपासून अनेक नियम बदलणार आहेत. यात UPI वापरण्यापासून ते रेल्वे तिकीट बुकिंग करण्यापर्यंत आणि गॅस सिलिंडरच्या दरापासून ते तुमच्या पेन्शनच्या गुंतवणुकीपर्यंतच्या बदलांचा समावेश असणार आहे. त्यामुळे या बदलांची नोंद असणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक असणार आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात कोणते मोठे बदल होणार आहेत एक नजर टाकूयात...
advertisement
2/6
Google Pay, Phone Pay या ॲप्समुळे दैनंदिन व्यवहार करणं सोप्पं झालं आहे. आता त्या UPI (Google Pay, PhonePe) मध्ये मोठा बदल होणार आहे. नव्या नियमानुसार 1 ऑक्टोबरपासून P2P व्यवहार कोणत्याही पेमेंट अॅपवरून तुम्हाला तुमच्या मित्र, कुटुंबिय किंवा कोणत्याही व्यक्तीकडे पैसे मागू शकणार नाही. यूपीआयची "कलेक्ट रिक्वेस्ट" किंवा "पुल ट्रान्झक्शन" हे फीचर पूर्णपणे बंद केलं जाणार आहे. हे तेच फीचर आहे, ज्यामुळे तुम्ही दुसऱ्या कोणाकडे तरी पेमेंटची रिक्वेस्ट पाठवून पैसे मागू शकत होता. ऑनलाइन फसवणूकीपासून बचाव करण्यासाठी एनपीसीआयनं हे पाऊल उचललं आहे. यातून यूपीआय व्यवहार सुरक्षित होणार आहेत.
advertisement
3/6
रेल्वेमध्ये होणारे गैरव्यवहार थांबवण्यासाठी आणि दलाली रोखण्यासाठी एक महत्त्वपूर्ण नियम लागू केला जाणार आहे. येत्या 1 ऑक्टोबर पासून, तत्काळ तिकीट बुकिंगच्या वेळी तिकीट काऊंटर उघडल्यानंतर पहिल्या 15 मिनिटात तिकीट बुकिंग करायचे असेल तर तुम्हाला आधार कार्ड IRCTC शी जोडणं बंधनकारक असणार आहे. यामुळे खऱ्या प्रवाशांना तिकीट मिळण्याची शक्यता वाढेल.
advertisement
4/6
1 ऑक्टोबरपासून ऑनलाइन गेमिंगच्या दुनियेत मोठा बदल होणार आहे. हे नवीन नियम लागू होण्याआधी सरकारनं गेमिंग कंपन्या, बँका आणि इतर संबंधितांशी चर्चा केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या कायद्याला मंजुरी ही दिली आहे. नव्या नियमांचा उद्देश ऑनलाइन गेमिंगला जास्त सुरक्षित आणि पारदर्शक बनवणं आहे. जेणेकरून ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांना फसवणुकीपासून वाचवता येणार आहे. शिवाय कंपन्यांवरही कठोर नियंत्रण ठेवता येणार आहे.
advertisement
5/6
सरकारी पेन्शन योजना NPS (नॅशनल पेन्शन सिस्टम) मध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत. आता सरकारी नसलेले सदस्य (Non-Government Subscribers) पेन्शनच्या १००% पर्यंत रक्कम शेअर मार्केटमध्ये (इक्विटी) गुंतवू शकतील. आधी ही मर्यादा ७५% होती. यामुळे जास्त फायदा मिळेल. तसेच खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना आता नवीन PRAN खाते उघडण्यासाठी शुल्क भरावे लागणार आहे. ई- प्राण किट (E-PRAN Kit): 18 रुपये, प्रत्यक्ष/ भौतिक PRAN कार्ड (Physical PRAN Card): 40 रुपये, वार्षिक देखभाल शुल्क (Annual Maintenance Charge) प्रति खाते: 100 रुपये इतके शुल्क भरावे लागणार आहेत.
advertisement
6/6
1 ऑक्टोबर रोजी एलपीजी सिलिंडरच्या किमतींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. दर महिन्यात हा बदल अपेक्षित असतो. गेल्या महिन्यात सिलिंजरचा दर 1631 रुपयांवरून कमी होऊन 1580 रुपये झाला होता. मात्र, नुकताच जीएसटी दर कमी झाल्यानंतरही गॅस सिलिंडरच्या किमती कमी झाल्या नव्हत्या हे ही विसरून चालणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
LPG गॅस ते गुगल पे… येत्या 1 ऑक्टोबरपासून 5 मोठे बदल; काय महाग, काय स्वस्त?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल