Pandharpur: विठ्ठल रुक्मिणी मंदिराला तब्बल 30 किलो चांदीचा दरवाजा, प्रवेशद्वार झळाळणार
- Published by:Prachi Amale
Last Updated:
नांदेड येथील अरगुलकर परिवाराच्यावतीने सदर दरवाजास चांदी बसवून देण्यात येत आहे.
advertisement
1/7

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन करण्याचे काम सुरू आहे.
advertisement
2/7
संत नामदेव पायरीवरील पितळी दरवाजा चांदीचा बनविण्याचा ठराव मंदिर समितीच्या बैठकीमध्ये करण्यात आला होता.
advertisement
3/7
दरम्यान नांदेड येथील अरगुलकर परिवाराच्यावतीने सदर दरवाजास चांदी बसवून देण्यात येत आहे.
advertisement
4/7
यासाठी तीस किलो चांदी लागणार असून याची किंमत जवळपास तीस लाख रूपये आहे.
advertisement
5/7
शंकर व नरसिमलू या बंधूंनी आपले वडील स्व. दिगंबर तुकाराम अरगुलकर व आई स्व. जनाबाई यांच्या स्मरणार्थ हा दरवाजा चांदीचा केला आहे.
advertisement
6/7
अरगुलकर परिवार श्री विठ्ठल रूक्मिणीचे निस्सीम भक्त आहेत. त्यानुसार मागील आठ दिवसापासून सदर काम सुरू आहे.
advertisement
7/7
यामुळे येथून भाविकांना प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. येत्या आठ दिवसात सदर काम पूर्ण झाल्यानंतर मंदिराच्या प्रवेशद्वाराला मोठी झळाळी मिळणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Pandharpur: विठ्ठल रुक्मिणी मंदिराला तब्बल 30 किलो चांदीचा दरवाजा, प्रवेशद्वार झळाळणार