सिंधुदुर्गमधील नदीत या दुर्मिळ अनोख्या प्राण्याचं दर्शन, हे मनमोहक Photos बघाच
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
सिंधुदुर्ग (विशाल रेवडेकर, प्रतिनिधी) : कणकवलीमधील वरवडे गावात दुर्मिळ पाणमांजरांचं दर्शन झालं आहे.
advertisement
1/7

अत्यंत दुर्मिळ अशा पाणमांजरांचं दर्शन कणकवलीमधील वरवडे गावातून वाहणाऱ्या गड नदीपात्रात झालं आहे.
advertisement
2/7
ही पाणमांजरं समूहाने फिरत असतात. ती नदीतील मासे, कासव, खेकडे अन्न म्हणून खातात.
advertisement
3/7
नदी आणि खाड्यांमध्ये खडकाळ भागात यांचा अधिवास असतो. पाणमांजर हा प्राणी संरक्षित प्राणी म्हणून देखील वनविभागाने त्यांचा शेड्यूल वनमध्ये समावेश केला आहे.
advertisement
4/7
तसं या पाणमांजरांचं वास्तव्य बऱ्याच नद्यांमध्ये असतं. पण पाण्याखालीच त्यांचं विश्व असल्यानं ती सहसा दिसत नाहीत. पाण्याखाली राहणारी ही पाणमांजरं अवघ्या पंधरा ते वीस सेकंदांसाठी बाहेर येतात
advertisement
5/7
पाणमांजराच्या वावरामुळे नदीचं पाणी शुद्ध होतं. कारण खराब झालेले किंवा मेलेले मासे ही पाणमांजरं खाऊन टाकतात
advertisement
6/7
गड नदीपात्रात यावेळी दोन पाणमांजरं दिसली. त्यांचा व्हिडिओही समोर आला आहे.
advertisement
7/7
व्हिडिओमध्ये ते एका खडकाखालून बाहेर येत दुसरीकडे पाण्यात जात असल्याचं पाहायला मिळतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
सिंधुदुर्गमधील नदीत या दुर्मिळ अनोख्या प्राण्याचं दर्शन, हे मनमोहक Photos बघाच