TRENDING:

समुद्र सपाटीपासून 2900 फूट उंचीवर, पावसाळी पर्यटनासाठी निसर्गरम्य ठिकाण, Photos

Last Updated:
सध्या पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे अनेकांना या मोसमात पर्यटनाला जायला आवडते. आज आम्ही तुम्हाला असेच एक सुंदर पर्यटनस्थळाची माहिती सांगणार आहोत. तुम्हाला हे पर्यटनस्थळ नक्कीच आहे. कुठे आहे पर्यटनस्थळ, काय आहे याचे महत्त्व, हे जाणून घेऊयात (प्रीती निकम/सांगली, प्रतिनिधी)
advertisement
1/9
समुद्र सपाटीपासून 2900 फूट उंचीवर, पावसाळी पर्यटनासाठी निसर्गरम्य ठिकाण, Photos
समुद्र सपाटीपासून 2900 फूट उंचीवर हिरव्यागार गर्द झाडीने नटलेल्या, नयनरम्य ठिकाणी वसलेले 'डोंगराई' नावाचे अतिप्राचीन असे मंदिर आहे. हे सांगली जिल्ह्यातील 'कडेगाव' या डोंगराळ तालुक्यात येते. कडेगावच्या दक्षिण बाजूला कडेपूर येथे हे मंदिर लक्ष्य वेधून घेते.समुद्र सपाटीपासून 2900 फूट उंचीवर हिरव्यागार गर्द झाडीने नटलेल्या, नयनरम्य ठिकाणी वसलेले 'डोंगराई' नावाचे अतिप्राचीन असे मंदिर आहे. हे सांगली जिल्ह्यातील 'कडेगाव' या डोंगराळ तालुक्यात येते. कडेगावच्या दक्षिण बाजूला कडेपूर येथे हे मंदिर लक्ष्य वेधून घेते.समुद्र सपाटीपासून 2900 फूट उंचीवर हिरव्यागार गर्द झाडीने नटलेल्या, नयनरम्य ठिकाणी वसलेले 'डोंगराई' नावाचे अतिप्राचीन असे मंदिर आहे. हे सांगली जिल्ह्यातील 'कडेगाव' या डोंगराळ तालुक्यात येते. कडेगावच्या दक्षिण बाजूला कडेपूर येथे हे मंदिर लक्ष्य वेधून घेते.समुद्र सपाटीपासून 2900 फूट उंचीवर हिरव्यागार गर्द झाडीने नटलेल्या, नयनरम्य ठिकाणी वसलेले 'डोंगराई' नावाचे अतिप्राचीन असे मंदिर आहे. हे सांगली जिल्ह्यातील 'कडेगाव' या डोंगराळ तालुक्यात येते. कडेगावच्या दक्षिण बाजूला कडेपूर येथे हे मंदिर लक्ष्य वेधून घेते.समुद्र सपाटीपासून 2900 फूट उंचीवर हिरव्यागार गर्द झाडीने नटलेल्या, नयनरम्य ठिकाणी वसलेले 'डोंगराई' नावाचे अतिप्राचीन असे मंदिर आहे. हे सांगली जिल्ह्यातील 'कडेगाव' या डोंगराळ तालुक्यात येते. कडेगावच्या दक्षिण बाजूला कडेपूर येथे हे मंदिर लक्ष्य वेधून घेते.समुद्र सपाटीपासून 2900 फूट उंचीवर हिरव्यागार गर्द झाडीने नटलेल्या, नयनरम्य ठिकाणी वसलेले 'डोंगराई' नावाचे अतिप्राचीन असे मंदिर आहे. हे सांगली जिल्ह्यातील 'कडेगाव' या डोंगराळ तालुक्यात येते. कडेगावच्या दक्षिण बाजूला कडेपूर येथे हे मंदिर लक्ष्य वेधून घेते.समुद्र सपाटीपासून 2900 फूट उंचीवर हिरव्यागार गर्द झाडीने नटलेल्या, नयनरम्य ठिकाणी वसलेले 'डोंगराई' नावाचे अतिप्राचीन असे मंदिर आहे. हे सांगली जिल्ह्यातील 'कडेगाव' या डोंगराळ तालुक्यात येते. कडेगावच्या दक्षिण बाजूला कडेपूर येथे हे मंदिर लक्ष्य वेधून घेते.
advertisement
2/9
इ.स. 1209 राजा भोज यांचा देवगिरीचा सम्राट सिंधण यादव यांनी पराभव करुन सातारा-कोल्हापूर भागावर सत्ता प्रस्थापित केली. त्यांच्या पदरी असलेल्या हेमाद्रिपंत यांनी श्री क्षेत्र डोंगराई मंदिराची उभारणी केली असल्याची आख्यायिका सांगितली जाते.
advertisement
3/9
पुढील काळात अनेक सरदार व कडेपूरच्या यादव-देशमुख घराण्यांनी या मंदिराची वेळोवेळी डागडुजी केली. त्यांनी तटबंदी गड बांधला. उत्तर दिशेला चिरेबंदी दरवाजा बांधला. गडाच्या पायऱ्या बांधल्या तसेच तोफखाना उभा केल्याचे सांगितले जाते.
advertisement
4/9
सध्या डोंगरावर चढण्यासाठी डांबरी रस्त्याची व्यवस्था आहे. येथे पिण्याच्या पाण्याची सोयही करण्यात आली आहे. या डोंगरावरुन कडेगाव तालुक्याचे विलोभनीय दृश्य दिसते. डोंगराच्या पायथ्याला कडेगाव, तडसर आणि नेर्लीचा तलाव दिसतो. या परिसरामध्ये डोंगराई देवीचे मंदिर मुख्य आहे.
advertisement
5/9
यासह भागुबाई मंदिर, तुकाई मंदिर, महादेव मंदिर अशी लहान मंदिरे आहेत. दगडी बांधकाम असलेली पूर्वीची घोडे बांधण्याची जागा आहे . त्यास "पागा" म्हणून संबोधिले जाते. मंदिराभोवती असणाऱ्या प्रवेशद्वारासह दगडी तटबंदी आहे . लहान-मोठ्या उंचीच्या दगडी दिपमाळ आहेत.
advertisement
6/9
महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अनेक भाविक श्रद्धेने भेट देतात. डोंगराई देवीची वर्षातून तीन वेळा यात्रा करतात. कर्नाटकातील भाविक येथे येऊन माघ पौर्णिमेला म्हणजेच नव्याच्या पौर्णिमेला यात्रा करतात. त्याचप्रमाणे श्रावण महिन्यातील सोमवार, मंगळवार आणि शुक्रवारी कडेगाव आणि परिसरातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्वाशिवाय येथील निसर्गसौंदर्य आकर्षक ठरते.
advertisement
7/9
पावसाळ्यात संपूर्ण डोंगर हिरव्यागार झाडांनी व्यापतो. येथे विविध जातीचे पक्षी आणि औषधी वनस्पती अशी जैवविविधता आढळते. येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पावसाळ्यामध्ये पर्यटक आवर्जून भेट देतात. शाळा-महाविद्यालयांच्या श्रावणी सहली येतात. तसेच भूगोलाचे अभ्यासक आणि वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक डोंगराईच्या डोंगरावरती अभ्यास दौरे करतात.
advertisement
8/9
डोंगराईचा डोंगर ताकारी रेल्वे स्टेशन पासून 23 किलोमीटर अंतरावर आहे. सांगली शहरापासून 64 किलोमीटर तर कडेगाव तालुक्याच्या ठिकाणापासून अवघ्या साडेचार किलोमीटर अंतरावर येतो. भाविक, पर्यटक स्वतःच्या वाहनाने किंवा खासगी वाहनाने डोंगराईला जातात. vvvv
advertisement
9/9
डोंगराई देवीच्या मंदिर परिसराला डॉ. पतंगराव कदम हे आघाडी काळात वनमंत्री असताना त्यांच्या प्रयत्नातून पर्यटनाचा दर्जा प्राप्त झाला. डोंगराच्या पायथ्यापर्यंत शासकीय बसने जाता येते. विशेषतः पावसाळ्यात डोंगराईची भेट आनंददायक ठरते. त्यामुळे श्रावण महिन्यात भाविकांसह निसर्गप्रेमी पर्यटक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/सांगली/
समुद्र सपाटीपासून 2900 फूट उंचीवर, पावसाळी पर्यटनासाठी निसर्गरम्य ठिकाण, Photos
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल