TRENDING:

'आई मुस्लिम होती, पण माझं कुटुंब...' अखेर समीर वानखेडेंनी धर्मावरून ट्रोल करण्यांना दिलं सडेतोड उत्तर

Last Updated:
Sameer Wankhede Religion : समीर वानखेडे यांच्या कामाप्रमाणेच त्यांच्या खाजगी आयुष्याबाबतही अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले आहेत. यावरच समीर वानखेडे यांनी एका मुलाखतीत सडेतोड उत्तरं दिली आहेत.
advertisement
1/7
अखेर समीर वानखेडेंनी धर्मावरून ट्रोल करण्यांना दिलं सडेतोड उत्तर
शाहरुख खानचा लेक आर्यन खान ड्रग केस प्रकरणामुळे चर्चेत आलेले आयआरएस अधिकारी समीर वानखेडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरण असो किंवा शाहरुख खानकडे लाच मागितल्याचे आरोप, समीर वानखेडे सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेच्या केंद्रभागी राहिले आहेत.
advertisement
2/7
समीर वानखेडे यांच्या कामाप्रमाणेच त्यांच्या खाजगी आयुष्याबाबतही अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले आहेत. यावरच समीर वानखेडे यांनी एका मुलाखतीत सडेतोड उत्तरं दिली आहेत. एका रोखठोक मुलाखतीत वानखेडेंनी आपल्या कुटुंबाचा इतिहास जगासमोर मांडला आहे.
advertisement
3/7
लोकप्रिय पत्रकार शुभंकर मिश्रा यांच्या मुलाखतीत समीर वानखेडे यांनी अनेक आरोपांवर अगदी मोकळेपणाने उत्तरे दिली आहेत. इतकंच नाही, तर त्यांच्याबद्दल समाजात असणाऱ्या अफवांवरही त्यांनी सणसणीत वार केला आहे.
advertisement
4/7
समीर वानखेडे यांच्या धर्माबाबत अनेकदा प्रश्न विचारण्यात आले आहेत. या मुलाखतीत समीर यांना "तुम्ही हिंदू आहात की मुस्लीम? अनुसूचित जातीचं (SC) प्रमाणपत्र खरं आहे की खोटं?" हे प्रश्न विचारण्यात आले. यावर समीर वानखेडेंनी अतिशय शांतपणे पण ठामपणे उत्तर दिलं.
advertisement
5/7
समीर वानखेडे म्हणाले, "लोकांना माझ्या बाबतीत काहीतरी वेगळंच घडावं असं वाटत होतं. पण सुदैवाने आपल्या देशात संविधान आणि तपास यंत्रणा अजूनही जिवंत आहेत. ऑगस्ट २०२२ मध्ये 'कास्ट स्क्रूटिनी कमिटी'ने माझ्यावरचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मी आणि माझं कुटुंब पिढ्यानपिढ्या हिंदू महार आहोत. माझं अख्खं गाव याचा पुरावा आहे."
advertisement
6/7
आपल्या पालकांबद्दल वानखेडेंनी सांगितलं, "माझ्या वडिलांनी १९७८ मध्ये प्रेमविवाह केला होता. माझी आई हरियाणातील मुरथलची होती आणि ती एका मुस्लीम कुटुंबात जन्मली होती. यात कोणतंही रॉकेट सायन्स नाही. आई मुस्लीम आणि वडील हिंदू महार, असा माझा कौटुंबिक वारसा आहे. पण काही लोकांना मुद्दाम कॉन्ट्रोव्हर्सी करायची होती, म्हणून त्यांनी माझ्या धर्माचा आणि लग्नाचा मुद्दा उकरून काढला."
advertisement
7/7
समीर वानखेडे यांनी भारताच्या संविधानावर विश्वास व्यक्त करत सांगितलं की केवळ कोणाच्या तरी आरोपांमुळे त्यांचं भारतीय संविधानाने दिलेलं सत्य बदलू शकत नाही. नोकरी मिळवण्यासाठी खोटं प्रमाणपत्र सादर केल्याचा दावाही त्यांनी पूर्णपणे फेटाळून लावला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'आई मुस्लिम होती, पण माझं कुटुंब...' अखेर समीर वानखेडेंनी धर्मावरून ट्रोल करण्यांना दिलं सडेतोड उत्तर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल