किशोर कुमार यांनी गायलंय Dhurandhar 2 मधील 'ते' गाणं, Youtube वर तब्बल 148 मिलिअन व्ह्यूज, तुम्ही ऐकलंय का?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Dhurandhar 2 Collection: धुरंधर २ मध्ये प्रेक्षकांना एक सरप्राइज मिळालं आहे. सर्व गाण्यांमधील एका गाण्याने प्रेक्षकांना वेड लावलं आहे.
advertisement
1/8

रणवीर सिंह-आदित्य धर यांच्या 'धुरंधर २' ने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. ८०० कोटींचा टप्पा पार करून या फिल्मने अवघ्या पाच दिवसातच नवा रेकॉर्ड तयार केला आहे. या फिल्मच्या पहिल्या भागाने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. मात्र आता दुसऱ्या भागाने हे वेड अनेक पटींनी वाढवलं आहे.
advertisement
2/8
'धुरंधर'च्या पहिल्या भागात बॉलिवूडमधील प्रसिद्ध रेट्रो गाणी रिमिक्स आणि आधुनिक स्वरूपात सादर करण्यात आली होती. अशातच आता दुसऱ्या भागातही बॉलिवूडमधील गाजलेली गाणी रिक्रिएट करण्यात आली आहेत. त्यातील एका गाण्याने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
advertisement
3/8
'धुरंधर २' मध्ये प्रेक्षकांना एक सरप्राइज मिळालं आहे. सर्व गाण्यांमधील एका गाण्याने प्रेक्षकांना वेड लावलं आहे, ते गाणं म्हणजे दिग्गज गायक किशोर कुमार यांचं ४१ वर्षे जुनं सदाबहार गाणं. आदित्य धर यांनी किशोरजींच्या गाण्याचा इतका प्रभावी वापर केला आहे, ज्याने प्रेक्षकांना आपल्या तालावर थिरकायला लावलंय.
advertisement
4/8
हे गाणं म्हणजे किशोर कुमार यांचं १९८५ मधील 'अलग अलग' या चित्रपटातील "कभी बेकसी ने मारा...". सुपरस्टार राजेश खन्ना आणि टीना मुनीम यांच्यावर चित्रीत झालेलं हे गाणं ८० च्या दशकात सुपरहिट ठरलं होतं. ४१ वर्षांनंतरही या गाण्याची जादू ओसरलेली नाही, हेच या चित्रपटाच्या यशावरून सिद्ध होतंय.
advertisement
5/8
विशेष म्हणजे, हे गाणं चित्रपटात एका अतिशय महत्त्वाच्या प्रसंगी ऐकायला मिळतं. जेव्हा हमजा आणि आलम यांच्यात संवाद होतो आणि हमजा आपल्या भूतकाळातील जखमा उलगडतो, तेव्हा बॅकग्राउंडला "कभी बेकसी ने मारा..." या ओळी ऐकायला मिळतात.
advertisement
6/8
चित्रपट पाहून बाहेर पडल्यानंतर अनेक प्रेक्षक हे गाणं यूट्यूबवर शोधत आहेत. सध्या यूट्यूबवर या गाण्याच्या मूळ व्हिडिओ आणि लिरिकल व्हर्जनला मिळून तब्बल १४८ मिलिअनहून व्ह्यूज मिळाले आहेत. नवीन पिढीसाठी हे गाणं नवं असलं, तरीही जुन्या पिढीच्या लोकांसाठी त्यांच्या जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत.
advertisement
7/8
केवळ किशोर कुमारच नाही, तर 'धुरंधर २' मध्ये ८० आणि ९० च्या दशकातील इतरही कल्ट गाण्यांचा वापर करण्यात आला आहे. 'त्रिदेव' मधील 'तिरछी टोपीवाले', 'थानेदार' मधील 'तम्मा तम्मा लोगे', 'दिल' मधील 'ओये ओये' आणि 'हम प्यार करने वाले' ही गाणी या फिल्ममध्ये वेगळाच जीव आणतात.
advertisement
8/8
या जुन्या गाण्यांना EDM आणि हिप-हॉपचा तडका देऊन आदित्य धर यांनी चित्रपटाची रंगत अधिकच वाढवली आहे. जुन्या आठवणी आणि आधुनिक ॲक्शनचा हा मेळ 'धुरंधर २' ला अधिकच खास बनवत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
किशोर कुमार यांनी गायलंय Dhurandhar 2 मधील 'ते' गाणं, Youtube वर तब्बल 148 मिलिअन व्ह्यूज, तुम्ही ऐकलंय का?