Weather Alert : वादळी वारे अन् विजांचा कडकडाट, मंगळवारी महाराष्ट्रावर अवकाळी संकट, या जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
कोकणात उष्ण आणि कोरडे हवामान कायम राहण्याचा अंदाज आहे. तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विभागानुसार हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/7

महाराष्ट्रातील हवामान मोठे बदल जाणवत आहेत. 24 मार्च रोजी राज्यावर दुहेरी संकट असेल. कोकणात उष्ण आणि कोरडे हवामान कायम राहण्याचा अंदाज आहे. तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विभागानुसार हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/7
कोकणात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरमध्ये उष्ण आणि दमट हवामान पाहायला मिळेल. मुंबईत कमाल तापमान 32-26 अंश सेल्सियस राहील. सिंधुदुर्ग वगळता सर्व जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट असेल.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा बदल पाहायला मिळत आहेत. पुण्यात कोरडे आणि उष्ण हवामान राहील. पुण्यात कमाल तापमान 33-36 अंश राहील. सातारा, सांगली आणि सोलापूरला अवकाळी पावसाचा यलो अलर्ट असेल. ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहतील. तसेच विजांसह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबारमध्ये उष्ण हवामान पहायला मिळेल. नाशिकमध्ये 33 - 35 अंश तापमान राहील. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.
advertisement
5/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणीमध्ये उष्ण आणि कोरडे हवामान राहील. कमाल तापमान 33 -37 राहील. धाराशिव, लातूर आणि नांदेडला अवकाळी पावसाचा यलो अलर्ट असेल. 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहून विजांसह पाऊस होईल.
advertisement
6/7
विदर्भात अवकाळी पावसानंतर परत आता उष्णता वाढलेली पाहायला मिळेल. नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणामध्ये उष्ण हवामान कायम असेल. कमाल तापमान 34-38 अंश तर किमान 21-24 अंश राहील.
advertisement
7/7
दरम्यान, 24 मार्च रोजी राज्यात उष्णतेची लाट आणि वादळी पाऊस असे संकट राहील. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : वादळी वारे अन् विजांचा कडकडाट, मंगळवारी महाराष्ट्रावर अवकाळी संकट, या जिल्ह्यांना अलर्ट