TRENDING:

शिवाने आदित्यला पळवलं! पारू मालिका बंद झाल्यानंतर नवी मालिका पाहून रंगली भलतीच चर्चा

Last Updated:
Marathi Serial : शेवटचा एपिसोड न दाखवता पारू मालिका अचानक बंद झाल्यानंतर मालिकेतील आदित्य हा शिवासोबत दिसला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आता वेगळीच चर्चा रंगू लागली आहे.
advertisement
1/9
शिवाने आदित्यला पळवलं! पारू मालिका बंद झाल्यानंतर नवी मालिका पाहून रंगली भलतीच चर्चा
मराठी मालिका </a>जिचा शेवटचा एपिसोड दाखवलाच नाही, ती अचानक बंद झाली. ही मालिका म्हणजे पारू." width="1600" height="900" /> सध्या कित्येक मराठी चॅनेल्सवर नव्या मराठी मालिकांची एंट्री आणि जुन्या मालिकांची एक्झिट सुरू आहे. जुन्या मालिका निरोप घेताना शेवटचा एपिसोड रिलीज करतात आणि तसं जाहीर करतात. पण एक मराठी मालिका जिचा शेवटचा एपिसोड दाखवलाच नाही, ती अचानक बंद झाली. ही मालिका म्हणजे पारू.
advertisement
2/9
कलर्स मराठी चॅनेलवरील ही मालिका अचानक बंद झाली. ही मालिका 12 फेब्रुवारी 2024 रोजी झी मराठीवर आलेली ही मालिका. 10 फेब्रुवारी 2026 नंतर मालिकेचा एपिसोड रिलीजच झाला नाही. मालिका संपली असा त्याचा शेवटचा एपिसोडही नाही. काही दिवसांनी या मालिकेचा शेवटचा भाग लवकर दाखवला जाणार असं सांगितलं जात होतं. पण महिना उलटून गेला तरी या मालिकेचा शेवटचा एपिसोड काही आला नाही.
advertisement
3/9
पारू मालिकेत अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री शरयू सोनावणे हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. प्रसाद आदित्यच्या तर शरयू पारूच्या भूमिकेत होती.
advertisement
4/9
पारू मालिका बंद झाल्यानंतर या मालिकेत आदित्यचं पात्र साकारणारा अभिनेता प्रसाद जवादेची आता नव्या मालिकेत एंट्री झाली आहे. पारू बंद झाल्यावर त्याला महिनाभरातच दुसरी मालिका मिळाली आहे.
advertisement
5/9
या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात प्रसाद जवादेची पहिली झलक पाहायला मिळत आहे. ज्यात तो  दारूच्या नशेत स्वत:चं डोकं काचेवर आपटून घेतो. आईच्या विरहात मनातून पूर्णपणे तुटलेला, अल्कोहोलिक झालेला अशी त्याची भूमिका आहे. प्रसाद जवादेचा एक वेगळाच अंदाज प्रेक्षकांना या मालिकेच्या निमित्तानं पाहायला मिळणार आहे.
advertisement
6/9
तर मालिकेत अभिनेत्री पूर्वा कौशिक मुख्य भूमिकेत आहे. जिने याआधी झी मराठीवरीलच शिवा मालिकेत शिवाची भूमिका करत होती. नव्या मालिकेत पूर्वा ज्योतीच्या भूमिकेत आहे. शांत, सगळ्यांना सांभाळून घेणारं असं तिचं पात्र आहे.
advertisement
7/9
पारू आणि शिवा दोन वेगळ्या चॅनेलवर वेगळ्या मालिका कधी एकमेकांचे स्पर्धक आणि या मालिकेतील आदित्य आणि शिवा हे स्पर्धक कलाकार आता एकाच मालिकेत एकत्र दिसणार आहेत. ही जोडी पाहण्यासाठी प्रेक्षकांनी उत्सुकता दाखवली आहे.
advertisement
8/9
या मालिकेचं नाव आहे दीपज्योती. झी मराठीवर ही मालिका पाहायला मिळणार आहे. मालिका कधीपासून दाखवली जाणार याबाबत अद्याप माहिती आलेली नाही. 
advertisement
9/9
दरम्यान पारू मालिकेनंतर दीपज्योती मालिकेत शिवासोबत आदित्य दिसल्याने सोशल मीडियावर शिवाने पारूच्या आदित्यला पळवलं अशा कमेंट येत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
शिवाने आदित्यला पळवलं! पारू मालिका बंद झाल्यानंतर नवी मालिका पाहून रंगली भलतीच चर्चा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल