Aajache Rashibhavishya : ग्रह बदलामुळे आर्थिक चंचन संपणार, सगळं मंगल होणार, फक्त ही चूक टाळा, आजचं राशिभविष्य
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
Aajache Rashibhavishya : ग्रह नक्षत्रांच्या बदलामुळे काही राशीना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.ज्योतिषी अशोक पाटील यांनी मेष ते मीन राशींचं आजचं राशीभविष्य सांगितलं आहे.
advertisement
1/13

मेष राशींच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस शुभ योग घेऊन येत आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नवीन काही गोष्टींची सुरुवात करण्याची असल्यास आजचा दिवस हा तुमच्यासाठी उत्तम आहे.
advertisement
2/13
वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा आर्थिक गणित बिघडवणारा असेल या राशीचा स्वामी शुक्र द्वादश स्थानात गेल्यामुळे खर्च होण्याची शक्यता आहे. विरोधकांचा काही प्रमाणात विरोधही जाणवेल. आरोग्याची काळजी घ्या.
advertisement
3/13
मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा संमिश्र असणार असून आज वादविवाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शांत राहणे महत्त्वाचे आहे. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी यश मिळेल. परंतु भावनिक निर्णय घेणे टाळा.
advertisement
4/13
कर्क राशींच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस व्यस्त असणार आहे. आज तुम्हाला जरा जास्त मेहनत करावी लागणार आहे. योग्य नियोजन आणि फोकसने काम करा. हार्डवर्क पेक्षा स्मार्ट वर्ककडे लक्ष द्या. कामांच्या गडबडीत आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. थोडाफार खर्च होणार आहे.
advertisement
5/13
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. आजच्या दिवसांत तुमच्या हातून दानधर्म घडेल. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी प्रलंबित असणारे कामे पूर्ण होण्याची आज दाट शक्यता आहे. तुम्ही काही नवीन योजना किंवा नवी सुरुवात करण्याचा विचार करत असाल तर आजचा शुभ आहे.
advertisement
6/13
कन्या राशीसाठी आजचा दिवस शुभयोग घेऊन येत आहे. आज तुम्हाला सकारात्मक बदल पहायला मिळतील. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सहकार्याकडून मदत मिळेल. कामानिमित्त प्रवास घडेल. ग्रहांची शुभ कृपादृष्टी तुमच्यावर होत असल्यामुळे आजचा दिवस समाधानकारक जाणार आहे.
advertisement
7/13
तुळ राशीसाठी आजचा दिवस ठीक असणार आहे. आज तुम्हाला आर्थिक आणि पार्टनरशिप संबंधांमध्ये महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागू शकतो. संयम ठेवून काम करा. मित्र आणि सहकार्यांसोबत संबंध मजबूत होतील. करिअरमध्ये स्थिरता आहे, परंतु स्पर्धात्मक कामात थोडा ताण येऊ शकतो.
advertisement
8/13
वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजच्या दिवसांत आर्थिक गणित कोलमडू शकतं. काही कारणांमुळे आज खर्च वाढू शकतो. नात्यांमध्ये संतुलन राखणे महत्त्वाचे आहे. क्रिएटिव्ह कामात यश मिळेल. आरोग्य चांगले राहील, परंतु थकवा जाणवू शकतो.
advertisement
9/13
धनु साठी आजचा दिवस आरोग्य आणि कामावर लक्ष केंद्रित करणारा आहे. मेहनतीने काम केल्यास उद्दिष्ट साध्य होईल. आर्थिक बाबतीत लाभ मिळण्याची शक्यता आहे. नवीन प्रोजेक्टसाठी योग्य वेळ आहे. नात्यांमध्ये संवादामुळे गैरसमज दूर होतील.
advertisement
10/13
मकर राशीसाठी आज ग्रहनक्षत्र उत्तम असल्यामुळे आर्थिक लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमच्याकडे पैसे येतील. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना अति घाई करू नका. आज शांत राहण्याचा प्रयत्न करा.
advertisement
11/13
कुंभ राशीसाठी आजचा दिवस ठीक असणार आहे. कामासोबत कुटुंबाला वेळ देणं महत्त्वाचं आहे. कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष केल्यास वाद विवाद होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होईल. सहकार्याची मदत मिळेल.
advertisement
12/13
मीन राशीसाठी आजचा दिवस हा सकारात्मक आहे. ग्रहनक्षत्राचे बदल तुमच्यासाठी आर्थिक लाभ घेऊन येत आहे. राशीतील गुरू वक्री असल्यामुळे गुरुजनांप्रती श्रद्धा आणि आदर ठेवणे लाभदायक असेल. मेहनतीने काम केल्यास यश मिळेल. नात्यांमध्ये संबंध मजबूत होतील. आरोग्य चांगले राहील, परंतु तणाव टाळा.
advertisement
13/13
टीप: हे नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणारे सर्वसामान्य राशिभविष्य आहे. अधिक सखोल माहिती मिळवण्यासाठी आपल्या जवळच्या ज्योतिषांशी संपर्क साधावा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Aajache Rashibhavishya : ग्रह बदलामुळे आर्थिक चंचन संपणार, सगळं मंगल होणार, फक्त ही चूक टाळा, आजचं राशिभविष्य