Weather Alert: महाराष्ट्रावर अस्मानी संकट कायम, बुधवारी वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार, 4 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
25 मार्च रोजी कोकणात उष्णतेची लाट कायम असेल. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/7

महाराष्ट्रावर ऐन उन्हाळात अस्मानी संकट आलं आहे. तर काही ठिकाणी उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. 25 मार्च रोजी कोकणात उष्णतेची लाट कायम असेल. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 25 मार्च रोजी हवामान कसं असेल पाहुयात.
advertisement
2/7
कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरमध्ये उष्ण आणि दमट हवामान कायम असेल. मुंबईत कमाल तापमान 33-36 अंश सेल्सिअस तर किमान 24-27 अंश राहील. आर्द्रता जास्त असल्याने उकाडा तीव्र जाणवेल. मुंबई, ठाणे, रायगडला उष्णतेचा यलो अलर्ट असेल.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूरमध्ये कोरडे आणि उष्ण असेल. सांगली आणि पुण्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुण्यात कमाल तापमान 33-36 अंश तर किमान 18-21 अंश असेल. सोलापूरला अवकाळी पावसाचा यलो अलर्ट असेल. सोलापुरात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील. तसेच विजांसह पाऊस होईल.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगरमध्ये हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नाशिकमध्ये 33-35 अंश तापमान राहील.
advertisement
5/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालनामध्ये उष्ण आणि कोरडे हवामान असेल. छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान 33-37 अंश तर किमान 20-23 अंश राहील. परभणी, बीड आणि हिंगोलीमध्ये हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. लातूर, नांदेड आणि धाराशिवमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील. तसेच विजांसह पाऊस होईल.
advertisement
6/7
विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि बुलढाणामध्ये उष्णता कायम असेल. कमाल तापमान 34-38 अंश तर किमान 21-24 अंश राहील.
advertisement
7/7
दरम्यान, राज्यात उष्णतेच्या लाटेसह अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आणि नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: महाराष्ट्रावर अस्मानी संकट कायम, बुधवारी वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार, 4 जिल्ह्यांना अलर्ट