TRENDING:

ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई, साताऱ्यात आज नळाला पाणी नाहीच! कारण काय?

Last Updated:
साताऱ्यातील नागरिकांना ऐन पावसाळ्यता पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे 2 दिवस पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय.
advertisement
1/5
ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई, साताऱ्यात आज नळाला पाणी नाहीच! कारण काय?
सातारकरांना ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईला सामोरं जावं लागणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला लिकेज असल्याने प्रचंड पाणी गळती सुरू झाले आहे. प्राधिकरणाकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून त्यासाठी पाणी उपसा बंद ठेवावा लागणार आहे.
advertisement
2/5
सातारा शहर आणि उपनगर परिसरातील पाणीपुरवठा आज, शुक्रवारी आणि शनिवारी विस्कळीत होणार असल्याचे सांगितले जात आहे. सातारा शहरातील अनेक पेठा आणि उपनगरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून लष्कर पाणी पुरवठा केंद्राद्वारे पाणीपुरवठा केला जातो.
advertisement
3/5
प्राधिकरणाच्या विसावा जलशुद्धीकरण केंद्रामध्ये 450 मिमी व्यासाची मुख्य दाबनलिका फुटून पाणी गळती झाली आहे. आता जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आला आहे. जलवाहिनीला गळती लागल्याने गुरुवारी पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता.
advertisement
4/5
जलवाहिनी दुरुस्तीसाठी आज संपूर्ण पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच 19 ऑक्टोंबर रोजी संबंधित भागात सकाळी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करून सहकार्य करावे, असे आवाहन प्राधिकरणाकडून करण्यात आला आहे..
advertisement
5/5
दरम्यान, सातारा शहरातील अनेक ठिकाणी या प्राधिकरणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठा खंडित झाल्याने पाणीटंचाईमुळे अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरू करावा, अशी मागणी देखील सातारकरांनी केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/सातारा/
ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई, साताऱ्यात आज नळाला पाणी नाहीच! कारण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल