TRENDING:

गोविंदांची पंढरी दुमदुमली, पहा ठाण्यातील टेंभी नाका दहीहंडीचे खास फोटो

Last Updated:
गोविंदांची पंढरी अशी ओळख असलेल्या ठाणे शहरातील टेंभी नाका येथील दिघे साहेबांचा दहीहंडी उत्सव पुन्हा एकदा गोविंदा पथकांनी दुमदुमला. तेव्हा दहीहंडी उत्सवाचे खास क्षण कॅमेऱ्यात टिपण्यात आले.
advertisement
1/5
गोविंदांची पंढरी दुमदुमली, पहा ठाण्यातील टेंभी नाका दहीहंडीचे खास फोटो
दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. मुंबई, ठाणे सारख्या शहरात राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांकडून दहीहंडीचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्रातील विविध भागातून येथे दहीहंडी पथक दाखल होत आहेत.
advertisement
2/5
स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरु केलेल्या ठाणे येथील टेंभी नाका दहीहंडी उत्सवाचे यंदाही मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे. ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी टेंभी नाका दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले असून येथे सकाळपासूनच दहीहंडी पथकांची रेलचेल पाहायला मिळाली.
advertisement
3/5
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांसह अभिनेता जॅकी भगनानी, अभिनेत्री रकूल प्रीत सिंग इत्यादींनी टेंभी नाका दहीहंडी उत्सवात हजेरी लावली. यासोबत अनेक नृत्य कलाकार आणि गायकांनी गोविंदांचे मनोरंजन केले.
advertisement
4/5
योग्य प्रकारे थर लावून सलामी देणाऱ्या पुरुष आणि महिला दहीहंडी पथकांना येथे बक्षिसांचे वितरण देखील करण्यात आले.
advertisement
5/5
महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेले दहीहंडी पथक हे मोठ्या उत्साहात मुंबई, ठाणे येथील दहीहंडी उत्सवात सहभागी होत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
गोविंदांची पंढरी दुमदुमली, पहा ठाण्यातील टेंभी नाका दहीहंडीचे खास फोटो
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल