TRENDING:

सलगच्या सुट्ट्यांमुळे त्र्यंबकेश्वर मंदिरात मोठा निर्णय, दर्शनाला जाण्याआधी वाचा नाहीतर कराल पश्चाताप

Last Updated:
नाताळ आणि वर्षअखेरीच्या सुट्ट्यांमुळे त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची गर्दी वाढली असून, देवस्थान ट्रस्टने २ जानेवारी २०२६ पर्यंत व्हीआयपी दर्शन सेवा बंद केली आहे.
advertisement
1/6
सलगच्या सुट्ट्यांमुळे त्र्यंबकेश्वर मंदिरात मोठा निर्णय, दर्शनाला जाण्याआधी वाचा
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक: नाताळच्या सुट्ट्या आणि वर्षअखेरीनिमित्त जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे नाशिकसह त्र्यंबकेश्वर नगरीत पर्यटकांची आणि भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर, दर्शनासाठी येणाऱ्या सामान्य भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, मंदिरातील व्हीआयपी दर्शन सेवा तात्पुरती बंद केली आहे.
advertisement
2/6
वर्षाच्या शेवटच्या दिवसांमध्ये दर्शनासाठी होणारी अफाट गर्दी लक्षात घेता, देवस्थानने २ जानेवारी २०२६ पर्यंत व्हीआयपी दर्शन व्यवस्था पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. व्हीआयपी दर्शनामुळे रांगेत उभे असलेल्या सामान्य भाविकांना ताटकळत राहावे लागते आणि दर्शनासाठी उशीर होतो.
advertisement
3/6
हा विलंब टाळण्यासाठी आणि सर्वांना समान न्याय मिळावा या उद्देशाने प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. सध्या त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची एवढी गर्दी वाढली आहे की, एका सामान्य भाविकाला दर्शनासाठी किमान ३ ते ४ तासांचा वेळ लागत आहे.
advertisement
4/6
नाशिक शहरासह जिल्ह्यातील इतर पर्यटनस्थळांवरही पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येत असून त्र्यंबकेश्वरमध्ये ही संख्या लाखांच्या घरात पोहोचली आहे.
advertisement
5/6
भरपूर वेळ रांगेत उभे राहावे लागत असल्यामुळे भाविकांचे हाल होऊ नयेत, याची काळजी मंदिर प्रशासनाकडून घेतली जात आहे. दर्शन रांगेत उभ्या असलेल्या भाविकांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासनामार्फत मोफत पाण्याची बाटली आणि फळांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे तासनतास रांगेत उभे असलेल्या भाविकांना मोठा दिलासा मिळत आहे.
advertisement
6/6
भाविकांना आवाहन: येत्या काही दिवसांत गर्दी आणखी वाढण्याची शक्यता असल्याने, प्रवाशांनी वेळेचे नियोजन करून आणि संयम राखून दर्शनासाठी यावे, असे आवाहन देवस्थान आणि पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
सलगच्या सुट्ट्यांमुळे त्र्यंबकेश्वर मंदिरात मोठा निर्णय, दर्शनाला जाण्याआधी वाचा नाहीतर कराल पश्चाताप
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल